शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

हॉटेल, लॉज आजपासून सुरू प्रशासनाकडून सशर्त परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 20:59 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : नियमांचे पालन न केल्यास कारवाई

धुळे : राज्य शासनाने जाहीर केलेल्या मिशन बिगीन अगेनच्या पाचव्या टप्प्यात बुधवारपासून प्रतिबंधित क्षेत्र वगळता हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस ३३ टक्के क्षमतेसह सुरू करण्यास सशर्त परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे़ जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांच्या आदेशान्वये ही परवानगी मिळाली आहे़राज्य शासनाने मिशन बिगीन अगेनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केली आहे. त्यानुसार ९ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हॉटेल, लॉज व गेस्ट हाऊस ३३ टक्के क्षमतेसह सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिध्द केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेले प्रतिबंधित क्षेत्र वगळून परवानगी दिली आहे़मार्गदर्शक सूचनाहॉटेल, लॉज, गेस्ट हाऊसमधील लहान मुलांकरीता खेळण्याचे क्षेत्र, जलतरण तलाव, जिम, व्यायामशाळा बंद राहतील. समारंभ आवारात मोठ्या प्रमाणात मेळावा, मंडळी निषिध्द राहतील. तथापि, जास्तीत जास्त १५ व्यक्तींच्या सहभागाच्या अधिन राहून ३३ टक्के क्षमतेच्या बैठकी हॉलचा वापर करण्यास परवानगी राहील. प्रत्येक वेळी पाहुणे खोली रिकामी झाल्यावर खोली आणि इतर सेवा क्षेत्राची साफसफाई, स्वच्छता व निजंर्तुकीकरण करणे आवश्यक राहील. ग्राहकांचा मुक्काम संपल्यानंतर सदर खोली किमान २४ तास रिकामी ठेवून त्यातील कापडी वस्तू बदलणे आवश्यक राहील. आवारातील शौचालय, पाणी पिण्याची व हात धुण्याची जागा येथे वारंवार स्वच्छता ठेवावी. क्वचित वेळी स्पर्श होणाºया पृष्ठ भागांची एक टक्के सोडिअम हायपोक्लोराइडचा वापर करुन नियमितपणे स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे प्रत्येक अतिथी गृहात व इतर ठिकाणी अनिवार्य आहे. कडीकोंडे, स्वयंचलित जिन्याची बटने, स्वच्छतागृहातील बटने, आधारासाठी किंवा तोल राखण्यासाठी धरावयाच्या जिन्यातील, बाथरुम मधील वगैरे कडीची दांडी, जिन्याचा कठडा नियमीत सॅनिटाईझ करावा़ एखादी व्यक्ती कोविड-19 सकारात्मक आढळली तर परिसराचे निजंर्तुकीकरण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. संशयित व्यक्ती अथवा रुग्णाचे घर, त्याची वसाहत तसेच त्याच्या राहण्याच्या खोलीचा इतर व्यक्तींशी संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी. संशयित व्यक्ती अथवा रुग्णाची माहिती त्वरीत जवळच्या रुग्णालयात अथवा आरोग्य केंद्रास द्यावी. राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या मदत केंद्रावर त्वरीत माहिती द्यावी.नियमांचे पालन करणे बंधनकारक४जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोराना विषाणूपासून बचावासाठी उपाययोजनांची माहिती देणारे फलक, पोस्टर, एव्ही मीडीया दर्शनी भागात लावावा. गर्दीचे नियोजन करून योग्य ते शारीरिक अंतर राखण्यासाठी वर्तुळे आखावीत. प्रवशेव्दाराजवळ थर्मल स्क्रीनिंग, रिसेप्शन टेबलजवळ प्रोटेक्शन ग्लास लावावा. पायाने वापरता येणारी हँड सॅनिटायझर मशीन लावावीत. कर्मचारी आणि ग्राहकांसाठी फेस मास्क, फेस कव्हर व ग्लोव्हजचा वापर करावा. चेक इन आणि चेक आऊट करण्यासाठी दफ कोड, आॅनलाईन फॉर्म, डिजिटल पेमेंट, ई-वॉलेट अशी विना संपर्काच्या प्रणालीचा वापर करण्यावर भर द्यावा़ लिफ्टमध्ये व्यक्तींची संख्या मयार्दीत असावी. प्रत्येक रुमच्या एसीचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअ दरम्यानच असावे. हॉटेल तसेच बाहेरील आवारात पार्कींगची व्यवस्था करावी.ग्राहकांसाठी मार्गदर्शक सूचनाकोरोना विषाणूची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल. फेस मास्क असल्यासच प्रवेश, हॉटेल, लॉजमध्ये वावरताना संपूर्ण वेळेत मास्क घालणे आवश्यक राहील. ग्राहकांचा, प्रवाशांचा तपशील (प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय स्थिती) आणि ओळखपत्र स्वागत कक्षात देणे बंधनकारक असेल. आरोग्य सेतू अ‍ॅप वापरणे बंधनकारक असेल. हाऊस कीपिंगची सुविधा कमीत कमी वापरण्यावर ग्राहकांनी भर द्यावा. तसेच हॉटेल व लॉजसारख्या ठिकाणांचा सध्या क्वारंटाइन सेंटर म्हणून वापर होत असल्यास महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत त्याचा क्वारंटाइन सुविधेसाठीच वापर केला जाणार आहे किंवा ३३ टक्के क्षमतेसह सुरळीत कामकाजास परवानगी मिळाल्याने उर्वरित भाग महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरला जाऊ शकतो.व्यवसायाला परवानगी दिल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो़ परंतु व्यवसाय सुरू करण्यास अडचणी आहेत़ कामगारांना परत बोलवावे लागेल़ देखभाल दुरूस्तीची कामे करावी लागतील़ त्यात आठवडा जाईल़- प्रितेश जैन, हॉटेल झन्कार पॅलेस

टॅग्स :Dhuleधुळे