शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ची धास्ती,बाजारपेठेत‘सन्नाटा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 15:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : कोरोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून जमाव बंदीचा आदेश लागू आहे़ त्यामुळे मंगळवारी बाजारपेठेच्या दिवशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून जमाव बंदीचा आदेश लागू आहे़ त्यामुळे मंगळवारी बाजारपेठेच्या दिवशी दिवसभर अघोषीत संचारबंदी दिसुन आली़नागरिकांमध्ये कोरोना विषाणुबाबत भीती व्यक्त केली जात आहे़ जिल्हा प्रशासनाकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे़ ‘लोकमत’ च्या टीमने मंगळवारी शहरातील आग्रारोडवर, पाचकंदील परिसर, मच्छीबाजार, पारोळारोड, बारापत्थर, फुलवाला चौक, देवपूर दत्तमंंदिर चौक, कराची वाला खुट परिसरात सर्व्हेक्षण केले़ यावेळी व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता नागरिकांमध्ये कोरोनाबाबत भीती व दक्षता घेतली जात असल्याने व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा आर्थिक फटका बसल्याचे व्यापारी दिलीप जैन यांनी सांगितले़न्यायालायाचे वेळापत्रक बदललेकोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी १७ मार्च २०२० पासून जिल्ह्यातील सर्व न्यायालयाचे कामकाज सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील़ कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत असेल़ दुपारी अडीच वाजेनंतर न्यायालयात कोणीही थांबणार नाही़ असे आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी दिले आहेत़ न्यायालयाच्या परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जावी़ तसेच दुपारी अडीच वाजेनंतर न्यायालयाच्या आवारातील उपहार गृह बंद करावेत़ परिसरात कोणीही पक्षकार, वकील, कर्मचारी आणि नागरिक कोणीही थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी़ रिमांडचे कामकाजही १७ मार्चपासून सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत करण्याचे निर्देश देण्यात आले़ अशी माहिती अध्यक्ष अ‍ॅड़ पाटील यांनी दिली़व्हायरस मॅपबाबत आवाहनजगभरात कोठे कोठे कोरोना व्हायरसची लागण लागलेली आहे याची माहिती घेण्याचा नागरिक प्रयत्न करीत आहेत़ त्याचा फायदा घेऊन सायबर चोरट्यांनी नवीन कोरोना व्हायरस मॅप तयार केलेला आहे़ या लिंकवर आपण क्लिक केल्यास आपली आवश्यक ती बँक खात्याची माहिती, पासवर्ड चोरण्याची शक्यता आहे़ त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी. तसेच कोणी अशी फसवणूक करु नये अन्यथा कारवाई होईल, अशी माहिती अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी दिली़

टॅग्स :Dhuleधुळे