यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. उषा शेलार, प्रा. भारती खैरनार, प्रा. डॉ. ज्योती वाकोडे, प्रा. सैंदाणे त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील, प्रा.एल.जी.सोनवणे, प्रा. सुनील पालखे आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या योगेश्वरी बिरारीस, साक्षी पाटील, अनम पठाण, प्रतीक्षा देवरे, निशा गवळे या यशस्वी विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. ज्योती वाकोडे, प्रा. उषा शेलार, प्रतीक्षा देवरे, निशा गवळी यांनी महिलांच्या कार्यकर्तृत्वावर संवाद साधला.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.एल.जी. सोनवणे, यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी भाषण करण्यापेक्षा सावित्रीबाईंचे विचार आचरणात आणा असा मौलिक सल्ला दिला. उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील यांनी "महिलाओं की कर्तबगारी " विषयी हिंदीत संवाद साधला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. लहू पवार यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विश्वास भामरे यांनी आभार मानले.