शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव प्रस्तावित पदांच्या मंजुरीसाठी शिक्षकांचे आझाद मैदानावर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 22:32 IST

जैताणे : १० ते ११ वर्षांपासून शिक्षक विना वेतन, विना मान्यता कार्यरत

जैताणे : गेल्या १० ते ११ वर्षांपासून अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पायाभूत पदांवर शिक्षक विना वेतन व विना मान्यता कार्यरत आहेत. त्यांच्या समस्यांना शासनापर्यंत नेण्याचा प्रयत्न धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करुन केला.वारंवार मागणी करूनही शिक्षण विभागाने मागणी मंजूर न केल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पुन्हा आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन केले. आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या, यासाठी शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा शिक्षण विभागाच्या चारूशिला चौधरी यांना निवेदन देण्यात आले व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली.वाढीव प्रस्तावित पदांना त्वरित मंजूरी व नेमणूक दिनांकापासून वेतन मिळावे,  या मागणीसाठी तसेच प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी संंघटनेचे उपाध्यक्ष विलास जाधव, आंधळकर, सचिव संजय शिंदे,  प्रा.सुरेश अहिरे, सुनील पूर्णपात्रे,  विलास खोपकर, शिवाजी जगताप, सुनील बैसाणे यांच्यासह राज्यातील सोलापूर, मुंबई, धुळे, जळगाव, नंदुरबार, नासिक, पुणे, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, नांदेड, सांगली, सातारा, उस्मानाबाद, बीड, मालेगाव, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, अलीबाग, पालघर, कल्याण, ठाणेसह राज्यातील पायाभूत पदांवरील व आय.टी.आय. क्षेत्रातील शिक्षक  मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. धुळे जिल्ह्यातून पंकज पगारे, गायत्री मोरे, सचिन भदाणे, सागर पाटील, पंकज शिरसाठ, गिरीश पाठक यांनी सहभाग नोंदविला.यावेळी प्रा.आंधळकर म्हणाले, पायाभूत पदांवरील शिक्षक गेल्या आठ ते दहा वर्षांपासून विनावेतन काम करत असून त्यांना न्याय मिळायलाच हवा. प्रा.सुरेश अहिरे म्हणाले, शिक्षण विभागाला सात हजार कोटी रुपये अनुदान अर्थ विभागाने दिले असून सुद्धा पायाभूत पदांवरील शिक्षकांना वेतन का देण्यात येत नाही हा एक चर्चेचा विषय बनला असून या शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे. प्रा.संजय शिंदे यांनी सांगितले की पायाभूत पदांवरील शिक्षकांना वेतन मिळणे गरजेचे असून आता त्यांना न्याय मिळालाच हवा मंत्रालयात तांत्रिक अडचणींमुळे सामना करावा लागत असून जर शासनाने या पदांवरील शिक्षकांना वेतनासहित मान्यता नाही दिल्या तर संघटना तीव्र आंदोलन छेडेल. प्रा.विलास जाधव यांनी विनावेतन काम करतांना किती समस्यांना तोंड द्यावे यांची माहिती दिली. 

टॅग्स :Dhuleधुळे