धुळे जिल्हात कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या वर्षभरातील कोरोना बाधितांच्या रूग्ण संख्येत सोमवारी उच्चांक गाठला. जिल्ह्यात तब्बल ५१५ रूग्ण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संर्सग वाढू नये. यासाठी प्रशासनाने तीन दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. लाॅकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी रूग्ण संख्येत प्रंचड वाढ झाली असून कोरोना बाधितांच्या संख्या पाचशे पार गेली आहे. याआधी १० मार्च रोजी जिल्ह्यात सर्वाधिक ३९८ रूग्ण पाॅझिटिव्ह आले होते. त्यानंतर सोमवारची ५१५ कोरोना बाधितांची संख्या सर्वाच्च आहे.
जिल्हात आतापर्यत सर्वाच्च संख्या तब्बल ५१५ रूग्ण आढळले पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 22:16 IST