शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धुळयात लोकप्रतिनिधींकडून रस्त्याच्या कामांवर सर्वाधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 11:56 IST

महापालिका, बांधकाम विभागामार्फत कोट्यवधीची कामे सुरू

ठळक मुद्दे-सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून रस्त्याच्या कामांना प्राधान्य-महापालिकेची निवडणूक केवळ दहा महिन्यांवर-राज्य नगरोत्थान, विशेष रस्ते अनुदान, विशेष निधीतून रस्त्यांची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेची निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर आल्याने मनपासह सर्व लोकप्रतिनिधींनी शहरात रस्ता कामांचा धडाका लावला आहे़ महापालिका, बांधकाम विभागाकडून कोट्यवधींची रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत़विशेष अनुदानातील कामेशहरात राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतून ४३ कोटींची रस्त्यांची कामे मार्गी लागल्यानंतर आता महापालिकेने २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षासाठी मिळालेल्या दीड कोटी रुपयांच्या विशेष रस्ता अनुदानातून नऊ रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत़ त्यात प्रभाग क्रमांक ६ मधील प्रमोद नगर भागातील मारोती मंदिर ते नाल्यापावेतोचा रस्ता (अंदाजित रक्कम- ९ लाख ९६ हजार ८४), प्रभाग क्रमांक ३४ मधील रेल्वेगेट ते रिक्षा स्टॉपपर्यंतचा मुख्य रस्ता (२० लाख २ हजार ११५), टॉवर बगिचा ते ताशागल्ली (१९ लाख ९० हजार २५६), त्र्यंबक नगर व जगन्नाथ नगरातील रस्ते (१४ लाख ९७ हजार ७१९), घड्याळवाली मस्जिद ते किसन बत्तीवाला खुंट (१५ लाख ६ हजार ७३९), प्रभाग क्रमांक ३३ मधील विविध भागात रस्ते डांबरीकरण करणे (१५ लाख १ हजार १२३), चाळीसगाव रोड अभय नगर परिसर रस्ता (२० लाख १ हजार ४६०), सुभाष पुतळा ते खुनी मस्जिद पर्यंतचा रस्ता (१५ लाख ९ हजार ४१७), झणझणी माता मंदिर ते गढीपावेतोच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण (१४ लाख ५७ हजार ७००) ही कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत़ तर दुसरीकडे नगरसेवकांकडूनदेखील आपापल्या प्रभागात जिल्हास्तरीय नगरोत्थान योजना, दलित वस्ती सुधार योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामांवर भर दिला जात आहे़नदीकाठचे रस्ते प्रगतिपथावरशहरात मनपाकडून रस्ता कामांवर भर दिला जात असतांना दुसरीकडे आमदार अनिल गोटेंच्या संकल्पनेतून प्रस्तावित पांझरा नदीपात्राच्या दोन्ही बाजूस साडेपाच किमीचे रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रगतिपथावर आहे़ ६५ कोटी २३ लाख ५७ हजार रुपयांच्या खर्चातून नदीपात्रात रस्ता व ब्रिज कम बंधाºयांचे काम सुरू आहे़ त्याचप्रमाणे साक्रीरोडच्या रूंदीकरणाचे काम बांधकाम विभागाकडून लवकरच हाती घेतले जाणार आहे़रेल्वेस्टेशन रस्त्यासाठी निधीकेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांच्या प्रयत्नाने नुकताच लेनिन चौक ते दसेरा मैदान या रस्त्याच्या कामासाठी १० कोटींचा विशेष निधी मंजूर झाला आहे़ त्यामुळे रेल्वेस्टेशन रस्त्याचे मोठे काम त्यामुळे मार्गी लागणार आहे़ तसेच गजानन कॉलनीतील नाल्याला संरक्षण भिंतीचे कामही त्यातून होणार आहे़