शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने घरे, पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 21:56 IST

छत कोसळून जवखेड्यात एकाचा मृत्यू : वर्षीत घरांची पडझड, खुडाणेत पिकांसह माती वाहून गेली

धुळे : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून त्यामुळे घरांची पडझड, पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे तसेच शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. शिरपूर तालुक्यातील जवखेडे येथे रविवारी पहाटे घराचे छत कोसळल्याने त्याखाली दबून एकाचा जागीच मृत्यू झाला. शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे अनेक घरांची पडझड झाली आहे.  छत कोसळल्याने एकाचा मृत्यूतºहाडी - शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथे घराचे छत कोसळल्याने त्याखाली दबून एकाचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे ही दुर्दैवी घटना घडली. गुलाब लोटन पाटील (५५) असे मृताचे नाव आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून रोज सायंकाळी मुसळधार पाऊस पडत असल्याने शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे घरात एकटे झोपले असताना पहाटे चार वाजता घराचे छत अचानक कोसळले. त्या छताखाली दबून पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ते घरी एकटे असल्याने ग्रामस्थांना उशिरा समजले. त्यामुळे तत्काळ मदत मिळू शकली नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. पीडित कुटुंबाला तत्परतेने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. मयत गुलाब पाटील यांची  पत्नी आजारी असून तिच्यावर नाशिक येथे दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परीवार आहे.विंचूर परिसरात सर्व बंधारे ओसंडले विंचूर - धूळे तालुक्यात विंचूर निमगुळ सह बोरी नदी परिसरात नियमित पाऊस सुरू असून रविवारी दुपारी पुन्हा दोन तास जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मांडळ धरणासह दोंदवाड, विंचूर, धामणगाव, बोधगाव आदी गावांचे सर्व कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत. पुरमेपाडा धरण ‘ओव्हर फ्लो’ झाल्याचे कळताच  पंचक्रोशीतील नागरिकांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली होती.‘रोहिणी’च्या पुराने नुकसाननिजामपूर - साक्री तालुक्यात खुडाणे शिवारात रोहिणी नदीला आलेल्या पुराचे पाणी कोल्हापूर सिमेंट बंधाºयाच्या बाजूने शेतात घुसून उभे बाजरी पीक व शेत जमीन वाहून गेली आहे. खुडाणे शिवारात रोहिणी नदी काठास प्रकाश बाबूराव काळे यांची शेती आहे. गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने रोहिणी नदीस मोठा पूर आला होता. नदीत असलेल्या कोल्हापूर टाईप बंधाºयाच्या बाजूने पुराचे पाणी काळे यांच्या शेतात घुसले. त्यामुळे २० गुंठे बाजरीच्या उभ्या पिकासह ३० गुंठे शेत जमीन वाहून गेली. पोलीस पाटील अनिल जाधव, शेतकरी कन्हैयालाल काळे, छबूलाल काळे, ग्रा़ पं़ सदस्य महारु माळचे, शेतकरी मालक प्रकाश बाबूराव काळे उपस्थित होते.वर्षी येथे अनेक घरांची पडझड वर्षी - शिंदखेडा तालुक्यातही दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून वर्षी ८० ते ९० घरांची पडझड झालेली आहे़ शेतात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर शिरल्याने कपाशीसह मका, बाजरी, ज्वारी, मूग पिकांचे नुकसान झाले आहे़ असाच जर पाऊस दोन तीन दिवस राहिला तर पिके शेतकºयांच्या हातून जातील अशी भिती निर्माण झाली आहे़ सतत पडणाºया पावसामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे