धुळे: तापमानाचा पारा वाढत असल्याने दुपारी वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य दिसू लागली आहेत़ गुरूवारी ४२ अंश असलेले तापमान शुक्रवारी ४४.६ अंश होते़ कमी अधिक होणारे तापमानामुळे धुळेकर नागरीक चांगलेच त्रस्त झाले आहेत़ रखरखत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असून ‘एप्रिल हॉट’मुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत़ त्यामुळे दुपारी १२ वाजेपासूनच वर्दळीचे रस्ते ओस पडत आहे़ हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला होता, एप्रिल महिन्यात तापमानाने उच्चांक गाठल्याने धुळेकरांना चटके बसत आहे़ शहरात थंडगार पाणी, आईस्क्रिम पार्लर, रसवंती, शितपेयांची दुकाने, लिंबूपाणी, गोला या शितपदार्थांना मागणी वाढली आहे़ सकाळपासूनच उन्हाची दाहकता जाणवत असून सायंकाळी उशिरापर्यंत झळा लागत आहेत़ नागरिक शक्य तेवढी कामे लवकर आटोपून घराकडे परतत असल्याने १२ ते ५ वाजेपर्यंत वर्दळ कमी होत असून शहरात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती दिसून येते़ शरीराला थंडावा मिळावा यासाठी शितपेयांना मागणी वाढली आहे़ दुपारी आणि सायंकाळी शेतपेय स्टॉलवर आता गर्दी होत आहे़ उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी टोप्या, उपरणे, बागायती रुमाल, गॉगल्सचा वापर वाढला आहे़ घराबाहेर निघणे अशक्य झाले आहे़ बहुतांश जणांकडे बागायती मोठ्या आकाराचे रुमाल दिसू लागले आहेत़ उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दुपारी त्यात अधिक भर पडत आहे़ परिणामी धुळेकर नागरीक शक्यतोअर घराबाहेर दुपारी निघत नसल्याने रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत़ सायंकाळी वाढली गर्दी सकाळपासून जाणवणाºया उन्हामुळे धुळेकर हैराण होत असताना सायंकाळच्या वेळेस रस्त्यावर गर्दी वाढलेली दिसत आहे़ सायंकाळी वाढली गर्दीसकाळपासून जाणवणाºया उन्हामुळे धुळेकर हैराण होत असताना सायंकाळच्या वेळेस रस्त्यावर गर्दी वाढलेली दिसत आहे़ शहरात सर्वदूर हेच चित्र पहावयास मिळत आहे़ आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ शहरात वाढलेल्या तापमानाचा तडाखा बसत असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़ तीव्र उन्हामुळे अस्वस्थपणा, थकवा, शरीर तापणे, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ ही लक्षणे आढळून येत असल्याने दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे़ त्याचप्रमाणे धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे खोकल्याची साथ सुरू असून काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आरोग्य केंद्राकडून करण्यात आले आहे़
मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच तापमानाने चाळीशी पार केली असून एप्रिलमध्ये देखील दरदिवशी तापमान जवळपास चाळीशीच्या पुढेच राहिले आहे़ त्यातच उष्णतेच्या लाटेमुळे अधिकच भर पडली आहे़ एप्रिल महिन्यात तापमानाचा उच्चाक गाठत शुक्रवारी तापमान ४४.६ अंशावर पोहलचे होते़ यापुढे देखील तापमानाने उच्चांक गाठण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे़