शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मे हीटचा तडाखा अन् उकाडाही झाला असह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:53 IST

तापमानाचा पारा ४२ वर : एक मे रोजी आठवड्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे़ त्यामुळे मे हीटचा तडाखा अन उकाडाही आता असह्य झाला आहे़ लॉकडाउनमुळे उपाययोजना करण्यास मर्यादा येत असल्याने नागरीक पुरते हैराण झाले आहेत़धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे़ सोमवारी ४२ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली़ किमान तापमान २१ अंश तर आद्रता ५०.२५ नोंदविण्यात आली़ रविवारी कमाल तापमान ४२.६, किमान २६ तर आर्द्रता ५७.२७ नोंदविण्यात आली़ शनिवारी कमाल तापमान ४३.३ आणि किमान २३.४ आणि आद्रता ५४.२३ नोंदविण्यात आली़ मे महिन्याच्या सुरूवातीलाच तापमानाने उच्चाक गाठला़ या आठवड्यातील सर्वाधिक तापमान एक तारखेला नोंदविण्यात आले़ या दिवशी कमाल तापमान ४३.४ तर किमान तापमान २५.४ अंश सेल्सीयस होते़ या दिवसाची आद्रता देखील ५४. २३ होती़ दुपारच्या वेळेला कमाल तापमानाचा पारा वाढता असल्याने उन्हाचे चटके जाणवत आहेत़ तर सायंकाळनंतर किमान तापमानाचा पारा देखील वाढतच असल्याने आद्रतेचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे रात्रीच्या वेळेला उकाडा वाढला आहे़ दिवसा उन्हाचे चटके तर रात्री घामाच्या धारा अशा दुहेरी तडाख्याने धुळेकरांसह जिल्ह्यातील नागरीक हैराण झाले आहेत़लॉकडाउनमुळे यंदाच्या उन्हाच्या झळा अधिकच जाणवत आहेत़ आईसक्रीम, शीतपेये यांचा दरवर्षी असणारा आधार यंदा लॉकडाउनमुळे हिरावला गेला आहे़ सर्वसामान्यांचे निंबू पाणी पिवून सर्वांनाचा दूधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे़उन्हाच्या तीव्रतेपासुन वाचण्यासाठी दरवर्षी हील स्टेशनवर जावून आराम आणि एन्जॉय करणाऱ्यांचे नियोजन देखील यंदा लॉकडाउनमुळे कोलमडले आहे़ कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असल्याने दक्षता म्हणून नागरीक घरातच राहणे पसंत करीत आहेत़ त्यामुळे उन्हाची आणि उकाड्याची दाहकता अधिकच जाणवत आहे़ज्यांच्या घरात एसी आणि कुलर आहेत त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणे उन्हाळा नाहीच्या बरोबरच आहे़ परंतु कामगार, कष्टकऱ्यांना मात्र दरवर्षापेक्षा यावर्षी अधिक त्रास सहन करावा लागत आहे़ लॉकडाउनमुळे कामे बंद असल्याने बाहेर पडता येत नाही़ त्यातच पत्र्याच्या घरात मे हीटच्या तटाख्यापुढे सर्वसाधारण पंखा कुचकामी ठरत आहे़ कुलर घेण्याची ऐपत असलेले लॉकडाउनमुळे दुकाने बंद असल्याने कुलर देखील घेवू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे़ ज्यांच्याकडे कुलर आहे त्यांना ते कुलर दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध नाही़ उन्हाची तीव्रता वाढत असल्याने लॉकडाउनच्या तिसºया टप्प्यात पंखे आणि कुलरच्या दुकानांना केंद्र शासनाने मुभा दिली असली तरी धुळे शहरातील बांधितांची संख्या लक्षात घेता संपूर्ण लॉकडाउन जाहीर केल्यामुळे दुकाने बंदच आहेत़पंखे, कुलरची दुकाने बंद असल्याने गैरसोयमे हीटच्या तडाख्यामुळे दिवसभर कडक उन आणि त्यामुळे रात्री होणाºया प्रचंड उकाड्याला हैरान झालेल्या नागरीकांनी आता पंखे आणि कुलर खरेदीची लगबग सुरू केली आहे़ परंतु दुकाने बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे़ ज्यांच्याकडे जुने कुलर आहेत त्यांनी दुरूस्तीला प्राधान्य दिले आहे तर ज्यांना नव्याने खरेदी करावयाचे आहे त्यांनी आपल्या नेहमीच्या दुकानदाराशी संपर्क करुन घरपोच पंखे आणि कुलर मागवून घेण्यास सुरूवात केली आहे़ डेझर कुलरच्या बंद दुकानांमध्ये गर्दी न होवू देता दुरूस्तीचे काम सुरू आहे़

टॅग्स :Dhuleधुळे