शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST

प्रधानदेवी हा पाडा ग्रुप ग्रामपंचायत गुऱ्हाळपाणी या अतिदुर्गम क्षेत्रात समाविष्ट आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्र वकवाड अंतर्गत ही गावे ...

प्रधानदेवी हा पाडा ग्रुप ग्रामपंचायत गुऱ्हाळपाणी या अतिदुर्गम क्षेत्रात समाविष्ट आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्र वकवाड अंतर्गत ही गावे मोडतात. त्यामुळे या आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अतिशय दुर्गम, क्षेत्रातील गुऱ्हाळपाणी, प्रधानदेवी, थुवानपाणी, कडईपाणी, पळसपाणी, कोळशापाणी, मोहिदा, शेमल्या, दुर्बळ्या, सितारापाडा अशी जवळपास १० ते १२ पाडे या आरोग्य केंद्राला जोडण्यात आली आहेत. परंतु या पाड्यांवर सेवा द्यायला डॉक्टर येत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत़. वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांची अरेरावी, यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. आरोग्य यंत्रणाच उपलब्ध नसल्याने अनेकदा रुग्णांना तातडीने तालुक्याच्या ठिकाणी हलवावं लागते. काही महिन्यांपूर्वीच येथे एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी बांबूच्या झोळीने बोराडी येथे आणल्याचा गंभीर प्रकार घडला होता.

काही दिवसांपूर्वीच येथील कोरोनासदृश व्यक्तीचा मृत्यू झाला असतानाही तेथे आरोग्य पथक अद्यापही पोहचले नाही. काही दिवसांपूर्वी येथील एका व्यक्तीला गंभीर अवस्थेत बोराडी येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले होते. डॉक्टरांनी सदर व्यक्तीला कोरोनाचे लक्षण असून ऑक्सिजनचा स्तरही खूप कमी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, वेळेवर उपचार होऊ न शकल्याने त्या व्यक्तीचा देखील मृत्यू झाला आहे़

दुर्गम व डोंगराळ भागातील रुग्ण वकवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून आहेत़ आदिवासी रुग्णांचे हाल होत आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत असून, वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे. तालुक्यातील ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांची आरोग्य सेवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून आहे. प्रधानदेवी येथे तात्काळ आरोग्य पथक दाखल होऊन आरोग्य तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.