शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवेचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 21:37 IST

उशिराने कामावर पोहचतात कर्मचारी । दवाखान्यात सर्वत्र घाणीचे साम्राज्य

कापडणे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला असून गैरहजर कर्मचाऱ्यांच्या रजेच्या अर्जावर रजा मंजूर म्हणून मुख्य डॉक्टरांची स्वाक्षरी नसणे, कर्मचारी बºयाच उशिराने कामावर पोहोचतात, रुग्णांच्या खाटाजवळ इलेक्ट्रिक साहित्यांचा खच पडलेला असतो. अशा विविध समस्यांमध्ये येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अडकले आहे.आरोग्य केंद्रास सकाळी नऊ वाजता आरोग्य केंद्रात भेट दिली असता त्यावेळेनंतर साडेनऊ वाजेपर्यंत अनेक कर्मचारी वेळेवर पोहोचलेले नव्हते. दवाखान्यातील आंतररुग्ण विभागात संततीचे आॅपरेशन झालेल्या महिला रुग्णांच्या नातेवाईकांनी यावेळी तक्रारींचा पाढा वाचला.दवाखान्यातील अत्यंत किंमती सौर ऊर्जा पॅनलवरती अस्ताव्यस्त खराटे ठेवलेले होत. आंतररुग्ण विभागासमोरील स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ दिसून आले. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रारीही केल्या.येथील बाथरूममध्ये वृक्ष ठेवण्यात आले आहेत. रुग्णांच्या पलंगावर अस्ताव्यस्त पडलेले कपडे व दवाखान्यात कोठेहीही अस्ताव्यस्त ठेवलेले मोठ्या स्वरूपाचे इलेक्ट्रिक वस्तू फिटिंगच्या पट्ट्या अत्यंत बेसिस्तपणे ठेवलेल्या होत्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य दवाखान्यात दिसून येत होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात अनावश्यक फेकलेला फलक पडून होता. अधिकाºयांच्या खुर्च्यांचे कव्हर फाटलेले आहे.शस्त्रक्रिया गृहाच्या मागील बाजूस प्रचंड घाणीचे व अस्वच्छतेचे वातावरण तसेच या दालनाच्या मागील बाजूचे बांधकाम जीर्ण व तुटलेले आहे. येथीलच रिकाम्या पडलेल्या हौदात दवाखान्यातील अनावश्यक फेकलेले साहित्य व केअर कचरा पडलेला आहे. दवाखान्यातील आस्थापना प्रशासन विभाग बंद आहे. प्रयोगशाळेचे दालन सकाळी साडेनऊ वाजता उशीरा येणाºया कर्मचाºयाने उघडले. हिरकणी कक्ष व इंजेक्शन रूमजवळ अत्यंत अस्वच्छ स्वरूपाचे व कुलर ठेवलेले होते. आंतररुग्ण विभागासमोर पत्र्याच्या छताला मोठ्या स्वरूपात जळमटे लागलेले आहे.एकच डॉक्टर असल्यामुळे रुग्णांचे अक्षरश: तपासणीसाठी रांगा लागतात. प्रतिनिधीने डॉक्टर लोहार यांना माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, दवाखान्यात मस्टर वरती एकूण १७ कर्मचारी आहेत पैकी पाच कर्मचारी अनुपस्थित होते. मुख्य वैद्यकीय अधिकारी विजयंता नागे या नाशिकला ट्रेनिंगला गेले आहेत व बायोमेट्रिक प्रणाली कर्मचाºयांची थम हजेरी प्रक्रिया बंद असून दवाखान्यातील काही महत्त्वाचे औषधेही संपली आहेत, अशी माहिती डॉक्टर लोहार यांनी दिली आहे.