शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील रेल्वेस्टेशन भागातील अतिक्रमणावर अखेर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 13:18 IST

स्थानिकांनी केला विरोध, रहिवाशांचे साहित्य रस्त्यावर, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

ठळक मुद्देअतिक्रमण काढण्यास काहींनी केला होता विरोधमहिलांनी रस्त्यावरच मांडला ठिय्यापोलिस बंदोबस्तात कारवाई सुरूच ठेवली.

आॅनलाईन लोकमत धुळे  : शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातील अतिक्रमण काढण्यास गुरूवारी सकाळी ६ वाजेपासून  सुरूवात झाली़ पहिल्या टप्प्यात फाशी पूल ते रेल्वेस्टेशन रोडपर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले़ पाच जेसीबींच्या सहाय्याने निवासी अतिक्रमण काढण्यात येत होते़  अतिक्रमण काढत असतांना, काहींनी विरोध केला. मात्र प्रचंड पोलिसांच्या फौजफाट्यात ही कारवाई सुरूच होती. दरम्यान अनेक वर्षांपूर्वीची स्वत:ची पडणारी घरे पाहून महिलांना अश्रू अनावर झाले होते़ शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील अतिक्रमणधारकांचे अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने आधीच जाहीर केल्यानुसार गुरूवारी सकाळपासून  अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरूवात केली़ स्थानिकांनी सुरूवातीलाही काहीसा विरोध केला़ मात्र पाच जेसीबींसह घंटागाड्या, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, क्रेन, रूग्णवाहिका, मालवाहू वाहने, अधिकाºयांच्या वाहनांसह मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला.  त्यामुळे अतिक्रमण धारकांनी घरातील सामान रस्त्यावर आणून ठेवत घरे रिकामी करण्यास सुरूवात केली व त्यानंतर घरे जेसीबीने पाडण्यात येत होती़ रेल्वेस्टेशन ते दसेरा मैदान या टप्प्यातील अतिक्रमणधारकांनी सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत अतिक्रमण हटविण्यास विरोध सुरू केला होता़ त्यासाठी स्टेशनरोडजवळ महिलांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. मात्र पहिल्या टप्प्यातील अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर पोलीसांनी विरोध करणाºया महिला व पुरूषांना ताब्यात घेतले़  त्यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते़ अनेक वर्षांपूर्वीची घरे डोळ्यादेखत भुईसपाट होत  असतांना महिलांना अश्रू अनावर झाले होते़ परंतु पोलीसांनी विरोध मोडून काढल्यानंतर पुढील कारवाई बंदोबस्तात सुरू करण्यात आली़ अतिक्रमणधारकांनीही स्वत:हून घरे रिकामी करण्यास सुरूवात केली़ ही कारवाई रात्रीपर्यंत सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले़ या कारवाईच्या पार्श्वभूमीवर स्टेशनरोडवरील वीज व पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता़  महावितरणच्या कर्मचाºयांनी घरांचे वीजमीटर काढून घेतले़ सद्यस्थितीत तणाव निवळला असून शांततेत कारवाई सुरू आहे़  या परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर  रस्त्याची रूंदी वाढविली जाणार आहे़