आॅनलाइन लोकमतउंटावद (जि.धुळे) :शिरपूर तालुक्यातील शेमल्या येथे शबरी सेवा समितीतर्फे आदिवासी पावरा समाजाचा सामूहिक विवाह सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. यात ५० जोडप्यांचे शुभमंगल झाले. या नवदाम्पत्यांना देवमोगरामातेची प्रतिमासह भागवत गीता, कपडे, संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले.केव्हीपी संस्थेच्या खजिनदार आशारंधे, माजी जि. प. सदस्या सिमा रंधे, शिक्षण विस्तार अधिकारी निता सोनवणे, सुरेखा गायकवाड, माजी जि. प. सदस्य दत्तू पाडवी, केंद्र प्रमुख किशोर भदाणे, सांगवी पोलीस स्टेशनचे एएसआय डी. टी. बाविस्कर, कॉस्टेबल साळुखे, खैरनार, विजय मोरे, सूर्यकांत गायकवाड, राजू गाणूशेट, उपस्थित होते.आशा रंधे म्हणाल्या की, सामुहिक विवाह हा सध्या काळाची गरज आहे. यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
धुळे जिल्ह्यातील शेमल्या येथे सामूहिक विवाह सोहळ्यात ५० जणांचे शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 11:50 IST