आॅनलाइन लोकमतधुळे : आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे एका महिला डॉक्टरवर सामूहिक अत्याचार करून तिला जिवंत जाळण्यात आले. महिलेवर अत्याचार करणाºयांना फाशी देण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.ॅदिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिला डॉक्टराला जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेचा देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, व समस्त हिंदूवादी संघटना निषेध करीत आहेत. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून अत्याचार करणाºया नराधमांना फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली होती. यावेळी अनेक महिला उपस्थित होत्या.
तरूणीला जिवंत जाळणाऱ्यांना फाशी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 13:19 IST