शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा साठाप्रकरणी अखेर व्यापाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 20:43 IST

३० लाखांचा माल जप्त : दोन दिवसांनंतर सुपारी सेंटर मालकावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील साक्री रोडवरील कुमारनगरात लाखो रुपयांचा गुटख्याचा बेकायदेशिर साठा केल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर सुपारी सेंटरचे व्यापारी प्रकाश ऊर्फ बाबु मोरुमल आसिजा (५२) यांना बेड्या ठोकल्या आहेत़धुळे शहर पोलिसांच्या पथकाने १५ मे रोजी सायंकाळी छापा टाकून २९ लाख २४ हजार ८८० रुपयांचा गुटखा जप्त केला होता़ परंतु गुन्हा दाखल करण्यास उशिर होत असल्याने शहरात चर्चेला उधाण आले होते़ अखेर पालिसांनी रविवारी सकाळी गुन्हा दाखल केला़ जप्त केलेल्या गुटख्याचा मुद्देमाल मोजण्यात आणि इतर काही पुराव्यांची खातरजमा करण्यात वेळ गेल्याचे पोलिसांनी सांगितले़कुमारनगरातील रहिवासी प्रकाश उर्फ बाबू मोरुमल आसिजा हे पानसुपारीचे घाऊक व्यापारी आहेत़ राजकमल सिनेमागृहाजवळ त्याच्या मालकीचे सुपारी सेंटर दुकान वजा गोडाऊन आहे़ असे असताना त्यांनी त्यांच्या घरात, भाडेतत्वाच्या घरात आणि जुन्या घरात विना परवाना गुटख्याचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार, पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी त्यांच्या तीनही घरांमध्ये तब्बल २९ लाख २४ हजार ८८० रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा आढळून आला़ त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पान मसाला, सुगंधित तंबाखु, इतर तंबाखुयुक्त पदार्थ, सिगारेट यांचा समावेश आहे़सध्या सर्वत्र कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे़ कोरोनाची ही संसर्ग साखळी खंडीत करण्यासाठी शासनाने लॉकडाउन केले आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी संचार बंदीचे आदेश दिले आहेत़ याची जाणीव असताना देखील संशयिताने आदेशाकडे दुर्लक्ष करुन बंदी असलेल्या गुटख्याचा आणि तंबाखुजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात विनापरवाना साठा करुन ठेवला़ तसेच बंदीमध्ये विक्री केल्यामुळे परिसरात गर्दी होवून सोशल डीस्टन्सिंगचे उल्लंघन झाले़ यातुन संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवून सामान्य जनतेच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे़याप्रकरणी पोलिस नाईक अनिल किसन चौधरी यांच्या फिर्यादीवरुन धुळे शहर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ५९ सह भादंवि कलम २७२, २७३, २६९, १८८ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ लॉकडाउनमध्ये गुटख्याचा साठा करणे आणि विक्री करणे संबंधित व्यापाºयाला चांगलेच महागात पडले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे