धुळे :गुरूनानक यांच्या ५५० व्या प्रकाश उत्सवाला येथील कुमारनगर भागातील बहावलपुरी पंचायत भवनातील गुरूद्वारात पाठसाहेबाने प्रारंभ झाला. गुरूनानक देव यांच्या ५५० व्या प्रकाश उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी कुमारनगर परिसरातील बहावलपुरी पंचायत येथील नुतनीकरण केलेल्या गुरूद्वाराची सुरूवात केलेली आहे. बाबा धीरजसिंग यांच्याहस्ते सुरआरती व अरदास करून गुरूग्रंथ साहेबची नव्या बनविलेल्या पालखीमध्ये स्थापना केली. प्रकाश करून पाठ साहेबाची सुरूवात करण्यात आली. १२ नोव्हेंबरपर्यंत पाठ सुरू राहतील. अखेरच्या दिवशी भोग व रात्री गुरू लंगर होईल.दिवसभर किर्तन व प्रवचन झाले. यावेळी बहावलपुरी पंचायतीचे अध्यक्ष किशोर रेलन, उपाध्यक्ष मदनलाल आरूजा, व कैलास वाधवा, सेक्रेटरी रमेश घुंडीयाल, महेश पोपली, अनिल लुल्ला, सुरेशकुमार सिंधाणी, सचिन अरोरा, मनीष वधवा आदी उपस्थित होते. १२ तारखेपर्यंत रोज सकाळी १० वाजता आशा दिवार आणि सायंकाळी ५ ते ७ यावेळेत वेगवेगळ्या महिला मंडळ व आश्रमातर्फे भजन, कीर्तन व सत्संग होणार आहे. १२ रोजी सकाळी ५.३० वाजता गुरूनानक सोसायटीपासून रॅली काढण्यात येणार आहे.
गुरूनानक जयंती उत्सवाला पाठसाहेबाने सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 11:47 IST