शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वीकारले झाडांचे पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 11:26 IST

झाड दत्तक योजना: ५०० विद्यार्थ्यांनी घेतले  प्रत्येकी १० झाडे दत्तक

ठळक मुद्देझाड दत्तक योजना महाराष्टÑातील पहिलाच प्रयोगविद्यार्थ्यांचा या योजनेला प्रतिसादमहाविद्यालयाचा परिसर हिरवागार होणार

आॅनलाइन लोकमतधुळे : राज्य शासनातर्फे शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी छायाचित्र काढण्यापुरतेच वृक्ष लावले जातात. त्या लावलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी कोणी  घेत नाही. मात्र धुळे येथील कृषी महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने १० झाडे दत्तक घेतली असून त्याचे संगोपन करण्याचीही जबाबदारी या विद्यार्थ्यांनीच घेतल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे सहायोगी अधिष्ठता डॉ. अशोक मुसमाडे यांनी दिली. पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून राज्यात  १०० कोटी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. त्यानुसार दरवर्षी १ जुलै रोजी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पडतो. मात्र काही ठिकाणी तर केवळ छायाचित्र काढण्यापुरतेच वृक्षारोपण होत असते. त्या लावलेल्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी फारशी कोणी घेताना दिसत नाही.  विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती व्हावी यादृष्टीने कृषी महाविद्यालयात झाडांची दत्तक योजना सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्टÑातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगण्यात आले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत धुळे येथे असलेल्या कृषी महाविद्यालयात कृषी पदवी व कृषी पदव्युत्तरचे  जवळपास ५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. महाविद्यालयात ‘झाड दत्तक योजना’ यावर्षापासून सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला दहा झाडे दत्तक दिलेली आहेत.    दत्तक घेतलेल्या झाडाची जबाबदारी त्या विद्यार्थ्यावरच सोपविण्यात आलेली आहे. या दहा विद्यार्थ्यांच्या समूहामध्ये एक ग्रुप लिडर देण्यात आलेला आहे. काही उणिवा अथवा गरजा असल्यास संबंधित विद्यार्थी या ग्रुप लिडरशी संपर्क साधतो. या उपक्रमामुळे कृषी महाविद्यालयाच्या परिसरात थोडी थोडके नव्हे तर तब्बल पाच हजार वृक्ष महाविद्यालय परिसरात उभी राहणार आहेत. यातील काही वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. त्यात  लिंबू, बांबू, सीताफळ, नीलगिरी आदी वृक्षांचा समावेश आहे. परिसर हिरवागार होणारकृषी महाविद्यालयाचा परिसर प्रचंड मोठा आहे. त्यात अगोदरच विविध प्रकारची झाडी लावण्यात आलेली आहे. झाड दत्तक योजनेमुळे त्यात अधिक भर पडून महाविद्यालयाचा परिसर अजून हिरवागार होण्यास मदत होणार आहे.

कृषी महाविद्यालयात झाड दत्तक योजना सुरू केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने १० झाड दत्तक घेतली आहे. या झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही विद्यार्थ्यांचीच आहे.               डॉ. अशोक मुसमाडे,सहयोगी कृषी अधिष्ठता,कृषी महाविद्यालय, धुळे 

टॅग्स :Dhuleधुळे