पालकमंत्र्यांचा दौरा असा : सोमवारी सकाळी १० वाजता आमदार फारुक शाह यांच्या गजानन कॉलनी येथील निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी १०.१५ वाजता आमदार फारुक शाह यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, सकाळी ११ वाजता आमदार फारुक शाह यांच्या वडजाई रोड येथील जागेची पाहणी, ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे कोविड- १९ अंतर्गत होणाऱ्या प्रादुर्भाव प्रतिबंधक करण्यासाठी उपाययोजना बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितींतर्गत सन २०२०-२०२१ पाणी आरक्षण करण्यासाठी आयोजित बैठकीस उपस्थिती, दुपारी १.३० वाजता जिल्हा वार्षिक नियोजन २०२०- २०२१ बाबत जिल्हाधिकारी व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतल्यानंतर दुपारी ३ वाजता मालेगावकडे रवाना होणार आहेत.
पालकमंत्री अब्दुल सत्तार आज धुळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST