शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’, ‘रेरा’ प्रामाणिक व्यावसायिकांसाठी लाभदायक - परेश साबद्रा

By admin | Updated: July 6, 2017 18:00 IST

‘जीएसटी’चा लाभ ग्राहकांना होणार असल्याचे संकेत शाह यांचे प्रतिपादन

 ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.6 - सरकारने बांधकाम क्षेत्रासाठी लागू केलेला ‘रेरा’ हा नवीन कायदा बांधकाम क्षेत्रातील अनागोंदी रोखणार असून केवळ प्रामाणिक व्यावसायिक या व्यवसायात टिकून राहतील, असे प्रतिपादन नाशिक येथील सीए परेश साबद्रा यांनी केल़े 
येथील केड्राई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे बुधवारी रेरा व जीएसटी या कायदा आणि करप्रणालीवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल़े  प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाशिक येथील सीए परेश साबद्रा व सीए संकेत शाह, क्रेडाईचे जिल्हाध्यक्ष संजय अहिरराव, सचिव दीपक अहिरे हे उपस्थित होत़े सीए परेश साबद्रा यांनी रेरा (रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट) हा कायदा बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारा आह़े बांधकाम क्षेत्रात कुणीही येऊन अनधिकृत बांधकामे करीत असल्याने हा कायदा लागू करण्यात आला असून त्यामुळे बांधकाम क्षेत्रात भविष्यात प्रामाणिक व्यावसायिकच व्यवसाय करू शकतील़ रेरामुळे सुरुवातीचे काही दिवस संभ्रमावस्था राहणार असली, तरी लवकरच सुटसुटीतपणा दिसून येईल़ रेरा अंतर्गत कोणत्या प्रकल्पांची नोंदणी करावी लागेल व कोणत्या प्रकल्पांची नोंदणी करावी लागणार नाही, याबाबत साबद्रा यांनी मार्गदर्शन केल़े ‘जीएसटी’बाबत संकेत शाह यांनी मार्गदर्शन केल़े जीएसटी ही करप्रणाली अत्यंत सुटसुटीत व लाभदायी आह़े मात्र, या करप्रणालीतून बांधकाम क्षेत्राला होणारा लाभ ग्राहकांना द्यावा लागणार आह़े वास्तविक जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्राला निश्चितपणे लाभ होईल, पण त्यामोबदल्यात ग्राहकांना पुरवाव्या लागणा:या सुविधांमुळे हा लाभ ग्राहकांच्या पदरी पडणार आह़े जीएसटीची नोंद ठेवताना तारखांचे गांभीर्य पाळावे लागेल़ प्रकल्पाच्या नोंदणीत वेगळी तारीख, जीएसटी नोंद करताना वेगळी तारीख अशाप्रकारचा गोंधळ चालणार नाही़ बांधकाम क्षेत्रात वस्तूंचे दर जीएसटीमुळे बदलणार असल्याने घर, प्लॉट व अन्य सर्व प्रकारच्या मालमत्तेच्या किमतींवर परिणाम होईल, असे शाह यांनी स्पष्ट केल़े