शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार निवारण समिती प्रथमच स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 16:50 IST

: मालनगाव संघर्ष समितीने जेसीबी मशिन दिले उपलब्ध करून

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पंतप्रधान पीक विमा योजनेत समाविष्ट शेतकºयांच्या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. सरकारने  या संदर्भात निर्णय घेतल्यानंतर देशात अशा पद्धतीने स्थापन झालेली ही पहिलीच समिती असल्याची माहिती अ‍ॅड.प्रकाश पाटील यांनी दिली. देशात पीक विमा योजना १९८४ पासून लागू करण्यात आली. त्यात वेळोवेळी शेतकºयांना फायदेशीर असे बदल करण्यात आले. खरीप हंमाम २०१६ पासून नवीन पंतप्रधान पीक विमा योजना लागू झाली. या योजनेतही शेतकºयांना फायदेशीर ठरतील, असे बदल करण्यात आले. या योजनेत केंद्र व राज्य अशी दोन्ही सरकारांकडून भरपूर अनुदान दिले जाते. मात्र तरीही शेतकºयांच्या योजनेविषयीच्या तक्रारी कमी होण्याऐवजी उलट वाढत आहेत. त्याची कारणे व उपाय पढावद, ता.शिंदखेडा येथील प्रगतीशील शेतकरी अ‍ॅड.प्रकाश पाटील यांनी राज्य व केंद्र सरकारला सूचविले होते. त्यातील काही सूचना केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचनांत समाविष्ट केल्या आहेत. त्यात शेतकºयांची रास्त तक्रार असेल तर ती कोणापुढे मांडावी? तसेच तक्रार निवारणाचे अधिकार कोणालाही नसल्यानेही शेतकºयांना न्याय मिळत नव्हता. यामुळे त्यांच्या तक्रारी वाढल्या   होत्या. मात्र नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत तक्रार निवारण समिती  नेमावी. तसेच त्यात शेतकरी प्रतिनिधी असावेत, असा बदल करण्यात आला आहे. समितीकडे तक्रार दाखल त्यानुसार अ‍ॅड.पाटील यांनी  जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांना बेटावद महसूल मंडळातील शेतकºयांच्या तक्रारी सादर करून त्यांना तक्रार निवारण समितीमार्फत न्याय देण्याची विनंती केली. या संदर्भात जिल्हाधिकारी रेखावार यांनी बैठक बोलवून निर्णय घेतला की, विमा कंपनी आणि कृषी विभाग यांच्या प्रतिनिधींनी स्टेट बँक  शाखा बेटावद, पंजाब नॅशनल बँक शाखा मुडावद येथे आणि धुळे तालुक्यात प्रत्येकी एक दिवस जाऊन तक्रारींवर बँकेतच निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. रब्बीसाठी विमा हप्त्यांबाबत दक्षतेचे आदेश रब्बी पिकांसाठी यंदा विमा हप्ता भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. यंदा दुष्काळ असल्याने रब्बी हंगामाचा पीक विमा हप्ता शेतकºयांनी मुदतीत भरावा, यासाठी कृषी विभागाने कृषी सहायक व तलाठी यांनी प्रत्येक गावात ठरविलेल्या तारखेला जाऊन विमा फॉर्म, ७/१२ उतारा ,बँक खाते पासबुकची प्रत हे एकत्र घेऊन रोज ठरल्याप्रमाणे नियोजित विमा हप्ता बँकेत भरावा, असे आदेश दिले आहेत. दिलेल्या लक्षांकाप्रमाणे सर्व शेतकºयांचा विमा हप्ता भरला जावा याकरीता जिल्ह्यात विभाग करुन त्यावर एक अधिकारी नेमून त्याच्याकडून रोज अहवाल घ्यावा, असे आदेश दिलेत. पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहू नये म्हणून दक्षता घेण्यासही सूचविले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे