शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:52 IST

पावसामुळे अर्थचक्र बिघडले : आॅक्टोबरमध्ये ७७ हजार ६२५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, ७१५ गावे बाधित

शिरपूर : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावून नेला आहे. आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे ७१५ गावातील अंदाजे ७७ हजार ६२५ हेक्टरवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे़ सततच्या या स्थितीमुळे ‘लढतोय, पण कणा मोडतोय’ अशीच व्यथा बळीराजाकडून व्यक्त होत आहे़गेल्यावर्षी कमी पावसामुळे खरीप व रब्बी हंगाम शेतकºयांच्या पदरी पडला नव्हता़ त्यामुळे २०१९ मध्ये तरी वरूणराजा प्रसन्न होणार का, अशी विवंचना शेतकºयांना लागली होती़ तालुक्यात जून ते आॅगस्ट या तीन महिन्यापर्यंत पाऊस होवूनही धरणे कोरडीच होती़करवंद व अनेर मध्यम प्रकल्पात पाण्याचा अल्प साठा होता़ तसेच तालुक्यातील १३ पैकी ८ लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट होते़ त्यामुळे कोरडा दुष्काळाला सामोरे जाण्याची भिती वाटत होती़ मात्र आॅगस्ट महिन्याच्या मध्यावर पावसाने जोरदार हजेरी लावून कहरच केला़ आॅक्टोबर महिन्यात सर्व धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली. पावसाला आता बास म्हणण्याची वेळ आलीय तरी देखील परतीच्या पावसाची जोरदार हजेरी सुरु आहे.परतीच्या पावसाने शहरासह तालुक्यात हजेरी लावल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे़ पिक कापणीला आले असतांना अधिकच्या पावसामुळे त्यास झाडावरच कोंब फुटू लागले़ काढणीला आलेल्या ज्वारी, मका, बाजरी, कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले़ त्यामुळे होत्याचे नव्हते झाल्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला़ कापसाचे उत्पन्न देखील आले नाही. बहुतांश शेतकºयांनी कपाशीवर केलेला फवारणी, खते, बियाणे यांचा खर्च देखील निघाला नसल्याचे सांगण्यात आले़सततच्या पावसामुळे बाधीत झालेल्या शेती पिके व फळपिकाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे़त्यात खरीप ज्वारी ४८१० हेक्टर, बाजरी ५६३५, मका ६९६५, भुईमूग २४०, सोयाबीन ९०२०, कापूस ३९७८०, भाजीपाला ६५, पपई ११० असे एकूण ७७ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे़ खरीप २०१९ मधील एकूण पेरणी क्षेत्र १ लाख ११ हजार ४२२ हेक्टर पैकी ७७ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे़ त्यात बाधित शेतकरी संख्या १ लाख ६ हजार ६७७ इतकी आहे़

टॅग्स :Dhuleधुळे