आॅनलाइन लोकमतधुळे : प्रदूषित नद्यांच्या पट्ट्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी नदी स्वच्छता मोहीम राबवावी. नदी पात्रात कचरा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र पर्यावरण सनियंत्रण दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. बोलत होते. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांनी बंदिस्त गटारीद्वारे गावातून निघणारे सांडपाणी एकत्रित करून त्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र तत्काळ कार्यान्वित करावे. या कामासाठी नागरिकांनीह सहकार्य करावे.प्रदूषित नद्यांच्या पट्ट्यातील प्रदूषण कमी करण्याकरीता संबंधित नगरपंचायत, महानगरपालिकेचे स्वतंत्र पथक कार्यान्वित करण्यात आले आहेत. या पथकांनी वेळोवेळी नदी पात्राची पाहणी करुन कार्यवाही करावी. ही पथके दंडात्मक कार्यवाही करू शकतात.नदी स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच नदी पात्रात कचरा होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. नदी पात्रात कचरा टाकताना कोणी आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाही करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.कृती आराखडा तयार करताना प्रदूषणाचे घटक निश्चित करणे, यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, निर्माण होणाºया कचºयाची संख्या, त्यावरील प्रक्रिया, घनकचºयाची गुणवत्ता, प्रदूषित पट्ट्यांमध्ये निर्माण होणारे सांडपाणी याबाबींचा समावेश करावा. तसेच नदी प्रदूषित पट्ट्यामध्ये उत्खनन होणार नाही याची खबरदारी संबंधित विभागाने घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे महाराष्ट्र प्रदूषिण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी सौजन्या सु. पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. दरम्यान या उपक्रमामुळे जिल्ह्यातून वाहणाºया नद्या स्वच्छ होतील. या उपक्रमाचे आता स्वागत होऊ लागलेले आहे.
धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी नदी स्वच्छता अभियान राबवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 11:28 IST