शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसमधून मांस हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 22:14 IST

टोलनाक्याजवळील कारवाई : सुटकेसमध्ये लपविलेले शोधून काढले; गरोक्षकांची जागरूकता

धुळे : एका लक्झरी बसमधून मांस मुंबईच्या दिशेने नेले जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली़ त्यानुसार लळींग टोलनाक्यावर सापळा लावून बसची तपासणी करण्यात आली असता एका सुटकेसमध्ये ९ हजार २०० रुपये किंमतीचे मांस आढळून आले़ ते मोहाडी पोलिसांच्या मदतीने जप्त करण्यात आले असून एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला़धुळ्यातील एका लक्झरी बसमधून सुटकेसच्या माध्यमातून मांस मुंबईच्या दिशेने जात असल्याची माहिती संजय शर्मा यांच्यासह गोरक्षकांना मिळाली होती़ त्यानुसार, संजय शर्मा, विकास गोमसाळे, प्रणील मंडलिक, कुणाल बोरसे, निलेश सपकाळ, राकेश ढिवरे, हर्षल गुरव, कुणाल घाटोळे, टिनू मोहिते आदींनी गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग टोलनाका परिसरात पाळत ठेवली होती़रात्री दहा वाजेच्या सुमारास एमएच १८ बीजी ३६१८ क्रमांकाची लक्झरी बस येताच गोरक्षकांनी ही बस थांबविली़ बसमधून मांस नेले जात असल्याचे सांगून तपासणी करण्याची मागणी केली़ यावेळी मोहाडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना देखील पाचारण करण्यात आले होते़ पोलिसांनी बसमधील एका सीटवर ठेवलेल्या दोन मोठ्या सुटकेसची तपासणी केली असता त्यात जनावरांचे मांस आढळून आले़ परिणामी ही लक्झरी बस मोहाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आली़ याप्रकरणी संजय रामेश्वर शर्मा (५०, रा़ आग्रा रोड, धुळे) यांनी फिर्याद दिली़ त्यानुसार, संशयित फकीर मोहम्मद खाटीक (६०, रा़ मच्छीबाजार, धुळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला़ घटनेची माहिती मिळताच संशयिताचे नातेवाईकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, सहायक पोलीस निरीक्षक व्ही़ एऩ ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक एस़ पी़ गायकवाड आदींनी पोलीस ठाण्यात येऊन माहिती संकलित केली़ मांस हे बकºयाचे असल्याचे सांगितले जात असल्यामुळे नेमके मांस कोणत्या जनावरांचे आहे याची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाºयास पाचारण करण्यात आले़ तपासणीत मांस हे जनावराचे असल्याचे स्पष्ट झाल्याने फकीर खाटीक या संशयिताविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ दरम्यान, मुंबईकडे जाणारे प्रवासी या कारवाईमुळे चांगलेच खोळंबले होते़ सुटकेस उतरवून बस मार्गस्थ करावी अशी मागणी प्रवाश्यांची होती़ परंतु बस सोडणार नसल्याची भूमिका पोलिसांची होती़ अखेर, दुसरी बस बोलावून प्रवासी मुंबईकडे मार्गस्थ करण्यात आले़

टॅग्स :Dhuleधुळे