शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील मानव विकासच्या २८ बसमध्ये  जीपीएस यंत्रणा कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 16:21 IST

विद्यार्थी, पालक, व शाळांना समजेल   बसची सद्यस्थिती

ठळक मुद्देजिल्ह्यात मानव विकासच्या ५० गाड्या धावतातत्यापैकी २८ बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविलीया यंत्रणेमुळे बसची सद्यस्थिती समजणार

आॅनलाइन लोकमतधुळे : मानव विकास कार्यक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यात पुरविण्यात आलेल्या एकूण २८ बसेसला जिल्हाधिकारी तथा जिल्हा मानव विकास समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून नुकतीच जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे बसची सद्यस्थिती नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. मानव विकास कार्यक्रमातून ग्रामीण भागातील मुलींकरीता मोफत बस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या बस जिल्ह्यातील विविध मार्गांवर धावतात. बसची सद्य:स्थिती जाणून घेण्याच्या उद्देशाने या बसमध्ये जीपीएस सयंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. विविध मार्गावर चालविण्यात येणाºया  बसची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे जिल्ह्यातील आगार व्यवस्थापक, शिक्षणाधिकारी, विद्यार्थी, पालक व शाळेला याद्वारे मिळू शकणार आहे. तसेच जीपीएस सयंत्राच्या माध्यमातून बसची सद्य:स्थिती, बसने केलेले मार्गक्रमण याद्वारे सर्व नागरिकांना पाहावयास मिळणार आहे.बसची माहिती जाणून घेण्यासाठी कोणत्याही इंटरनेट ब्राऊजरमध्ये संबंधित  लिंक उघडून यूजर नेम  व पासवर्डच्या मदतीने बसची माहिती कोणत्याही संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईलवर इंटरनेट ब्राऊजरच्या साहाय्याने पाहू शकतात.  ही प्रणाली सर्वसामान्य नागरिकांकरीता मोफत सुरू करण्यात आली आहे. शिक्षण विभागासह अधिकाधिक विद्यार्थी, पालक, शाळा प्रशासन व नागरिकांनी जीपीएस प्रणालीद्वारे मिळणाºया माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  रेखावार यांनी केले आहे. 

या बसेसमध्ये काही बिघाड झाल्यास ज्या आगाराच्या बसमध्ये बिघाड झाला आहे त्या आगारामार्फत तात्पुरत्या स्वरुपात चालविण्यात येणाºया सात बसेसची सद्य:स्थिती शिवाय प्रत्येक आगाराकडे पुरविण्यात आलेल्या अतिरिक्त यंत्रणांद्वारे आठव्या व नवव्या क्रमांकावर तात्पुरत्या स्वरुपात चालविण्यात येणाºया  बस पाहता येतील. यात उदा. दोंडाईचा आगाराकरीता दोंडाईचा-१, दोंडाईचा-२ तर साक्री आगारासाठी साक्री१, साक्री२ अशा स्वरुपात प्रत्येक आगाराच्या बसची नावे दिसतील.