धुळे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील कार्यक्रम आटोपून धुळ्याकडे रवाना झाले आहेत़ त्या पार्श्वभूमीवर येथील महापालिकेजवळ पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे़ ज्यांच्याकडे पास दिले आहेत त्यांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात येत आहे़ शिवाय या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे़
राज्यपाल धुळ्याकडे रवाना, महापालिकेजवळ बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 11:28 IST