शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘शिटी’ चिन्हासाठी दाखल याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:36 IST

धुळे महापालिका निवडणूक : आमदार गोटेंच्या उमेदवार वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणुकीत गुरुवारी प्रभाग १२ मधील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. दरम्यान, आमदार अनिल गोटे यांच्या हत्येचा कट केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून चौकशीचे काम सुरु असल्याची माहिती देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिली. दरम्यान, ‘शिटी’चे चिन्ह मिळविण्यासाठी दाखल याचिका औरंगाबाद खंडपिठाने फेटाळून लावलीमहापालिका निवडणुकीसाठी प्रभाग १२ अ मधील उमेदवार बिनविरोध निवडून आल्यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरु होती. म्हणून संपूर्ण प्रभागातील उमेदवारांच्या चिन्ह वाटपची प्रक्रिया लांबली होती. त्यानुसार गुरुवारी प्रभागाच्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. प्रभागाची पुढील निवडणूक प्रक्रिया ही आधी घोषित कार्यक्रमानुसारच होणार आहे.‘शिटी’संदर्भातील याचिका फेटाळली निवडणुकीत लोकसंग्राम पक्षाच्या सर्व उमेदवारांना शिटी चिन्ह द्यावे या मागणीसाठी आमदार अनिल गोटे यांनी खंडपिठात याचिका दाखल केली होती. खंडपिठाने ती याचिका गुरुवारी फेटाळून लावली. त्यामुळे आता आमदार अडचणीत सापडले आहे. कारण त्यांच्या लोकसंग्रामच्या तीनच उमेदवारांना शिटीचे चिन्ह मिळाले आहे. अन्य उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. यामुळे प्रचारात अनेक अडथळे निर्माण होणार आहे. तसेच लोकसंग्रामच्या प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेही अद्याप आमदार गोटे यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.  अद्याप गुन्हा दाखल नाहीदरम्यान, आमदार अनिल गोटे यांचा हत्येचा कट केल्याप्रकरणी व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपमधील संभाषणाची चौकशी करण्यासाठी बुधवारी रात्री पोलिसांनी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु गुरुवार सायंकाळपर्यंत यासंदर्भात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी अद्याप सुरु असल्याची माहिती देवपूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी ‘लोकमत’ला मोबाईलवरुन दिली.आमदार अनिल गोटे मुंबईतच पक्षाने मराठा आरक्षणचे विधेयकासाठी सर्वच आमदारांना विधानसभेत उपस्थित राहण्यासंदर्भात व्हीप काढले होते. त्यामुये आमदार अनिल गाटे हे बुधवारपासून मुंबईत आहेत. बुधवारी त्यांनी विधानसभेत भाषण करतांना धुळ्यातील गुन्हेगारीसंदर्भात वक्तव्य भाजपला घरचा आहेर दिला होता.गुरुवारीसुद्धा आमदार गोटे हे मुंबईत तळ ठोकून होते.

टॅग्स :Dhuleधुळे