शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राष्‍ट्रीय शालेय कुस्तीस्पर्धेत धुळ्याच्या खेळाडूंनी मिळविले सुवर्ण, रौप्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 15:56 IST

पदक मिळविताच अनेकांनी केला जल्लोष, खेळाडूंचे कौतुक

ठळक मुद्देधुळेकर खेळाडूंची कुस्ती बघण्यासाठी झाली होती गर्दीजगदीश रोकडेने कर्नाटकच्या सुरज.एस.चा केला पराभवनिखील माळीचा दिल्लीच्या खेळाडूकडून पराभव

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राष्‍ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत दुसºया दिवशी धुळ्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट डावपेच टाकत, स्पर्धेवर आपली छाप सोडली. यात ४२ किलोवजन गटात ग्रीकरोमन प्रकारात जगदीश रोकडे याने सुवर्ण तर याच गटातील फ्रीस्टाईल प्रकारात निखील माळी याने रौप्य पदक प्राप्त करून दिले. धुळ्याच्या खेळाडूंकडे लक्षबुधवारी जगदीश रोकडे व निखील माळी यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केल्याने, दोघांच्याही कुस्ती सामन्याकडे धुळेवासियांचे लक्ष लागलेले होते.आज सकाळी ग्रीकरोमन गटात जगदीश रोकडे (धुळे, महाराष्‍ट्र ) विरूद्ध सुरज.एस (कर्नाटक) यांच्यात अंतिम सामना झाला. ही लढाई अत्यंत चुरशीची झाली. मध्यंतरापर्यंत दोघांनाही दोन-दोन असे समान गुण होते. त्यानंतरच्यावेळेत जगदीशने डाव टाकत एक गुणाची कमाई करून,  विजय मिळवित महाराष्‍ट्रला सुवर्णपदक प्राप्त करून दिले. जगदीशने विजय मिळविताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. यानंतर ४२ किलो वजन गटातच निखील माळी (धुळे, महाराष्‍ट्र) व विशांत जे.सिंग (दिल्ली) यांच्यात चुरशीचा सामना झाला. दुसºया व तिसºया फेरीत निखील माळीने प्रतिस्पर्ध्याला अवघ्या २५ व १५ सेकंदात पराभूत केल्याने, त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु अंतिम सामन्यात दिल्लीचा विशांत सिंग वरचढ ठरला. त्याने निखीलचा पराभव केला.  त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. निखीलने रौप्य मिळविताच अनेकांनी त्याचे कौतुक केले, काहींनी बक्षीसेही दिली.दुसरा दिवस धुळ्याच्या जगदीश रोकडे व निखील माळी यांनी गाजवून सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई केली.