शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार ग्राहकांनी सोडली गॅस सबसिडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सरकारतर्फे गॅसवर मिळणारी सबसिडी सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला धुळे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १२ हजार ८०२ ग्राहकांनी त्यांची गॅस सबसिडी सोडल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे.  तर जिल्ह्यातील ३ लाख ५५ हजार ११७ गॅस धारकांपैकी अद्याप ३१ हजार ...

ठळक मुद्दे १२ ग्राहकांनीच केले आधारकार्ड क्रमांक लिकिंग३ लाख ५५ हजार ११७ गॅसधारक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सरकारतर्फे गॅसवर मिळणारी सबसिडी सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला धुळे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १२ हजार ८०२ ग्राहकांनी त्यांची गॅस सबसिडी सोडल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे.  तर जिल्ह्यातील ३ लाख ५५ हजार ११७ गॅस धारकांपैकी अद्याप ३१ हजार ४८९ गॅसधारकांनी गॅस सबसिडी मिळण्यासाठी त्यांच्या बँक खात्याशी आधारकार्ड क्रमांक संलग्न न केल्यामुळे सबसिडीचा लाभ त्यांना मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. देशातील ग्रामीण भागात आजही गॅस मिळत नसल्यामुळे अशा ठिकाणी वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणावर होत आहे. ते रोखण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरजू जनतेला गॅस सिलिंडर व किटचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच गॅस सबसिडीचा खरोखरच गरजू व्यक्तींना लाभ घेता यावा, यासाठी आर्थिकदृष्टया सक्षम लोकांनी गॅस सबसिडी सोडावी, असे आवाहन सरकारने केले होते. ज्या ग्राहकांनी त्यांची गॅस सबसिडी सोडली आहे. त्याची माहिती गॅस वितरक एजन्सीमार्फत आॅनलाइन जाहीर करण्यात आली होती. त्याची नोंद जिल्हा पुरवठा विभागाकडेही झाली असून त्याचा अहवालही शासनाकडे पाठविण्यात आला आहे.वर्षभरात १२ ग्राहकांनीच केले आधारकार्ड क्रमांक लिकिंग जिल्ह्यात एकूण २४ गॅस एजन्सीज् आहेत. या सर्व एजन्सीचे मिळून एकूण ३ लाख ५५ हजार ११७ ग्राहक आहेत. पैकी ३१ हजार ४८९ ग्राहकांनी गॅस सबसिडी मिळण्यासाठी त्यांच्या बँक खात्याशी लिकिंग केलेले नाही. गेल्यावर्षी ३१ हजार ५०१ ग्राहकांनी आधारकार्ड क्रमांक बॅँक खात्याशी लिकिंग केलेला नव्हता. म्हणजे वर्षभरात केवळ १२ गॅस धारकांनीच सबसिडी मिळण्यासाठी आधारकार्ड बॅँक खात्याशी लिकिंग केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दीड लाख ग्राहकांकडे दोन सिलिंडर धुळे जिल्ह्यात १ लाख ५५ हजार ११७ ग्राहक दोन सिलिंडरचा वापर करतात. तर १ लाख ९८ हजार ६३८ ग्राहक हे एकच सिलिंडर वापरत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे. धुळे तालुक्यात गॅसधारक ग्राहकांची एकूण संख्या १ लाख ९४ हजार ८३६ इतकी आहे. पैकी ९ हजार ८५० ग्राहकांनी गॅस सबसिडी सोडली आहे; तर साक्री तालुक्यात ५४ हजार ३५८ गॅस धारकांपैकी केवळ ९६ , शिरपूरला ५२ हजार ६४१ गॅसधारकांपैकी १,५४५ तर शिंदखेड्यात ५३ हजार २८२ गॅसधारकांपैकी १ हजार ३११ गॅसधारकांनी सबसिडी सोडली        आहे.