कोरोनामुळे नोंदणीवर होतोय परिणाम
- कोरोना सुरू होण्यापूर्वी वर्षभरात किमान ६० ते ६५ विवाह नोंदणी होत होती़ आवश्यक ती कागदपत्रे घेऊन नोंदणीला प्राधान्य दिले जात होते़
- कोरोना सुरू झाल्यानंतर विवाह नोंदणीला अल्प प्रतिसाद देण्यात आला़ रोज एक ते दोनच नोंदणी करण्याचे काम मार्गी लावण्यात आले़
प्रतिक्रिया
- कोरोनाचा काळ सुरू झाल्यामुळे विवाह नोंदणीला खूप अडथळे येत होते़ एकतर विवाह जुळत नाही़ नोकरीला प्राधान्य असल्याचे सांगितले जाते़ छोकरी मिळविण्यासाठी नोकरी असल्याचे काही जण सांगतात़ नंतर नोकरीच नसल्याचे कळते़ हे असे चुकीचे आहे़
कल्पेश जाधव, धुळे
- नोकरी मिळविणे आता खूप अवघड झाले आहे़ कोरोनामुळे तर अधिकच कठीण असे होऊन बसले आहे़ छोकरी मिळविण्यासाठी नोकरी मिळविणे अधिकच गरजेचे आहे़ नोकरी नाही तर छोकरी नाही, अशी आता नवी व्याख्या निर्माण होत असल्याचा अनुभव येऊ लागला आहे़
विवेकानंद विभुते, धुळे
कोरोना काळापूर्वीपासून विवाह नोंदणीला प्राधान्य देण्यात आले आहे़ पूर्वी ही संख्या तशी अधिक होती़ आता कोरोना असल्यामुळे संख्या कमी असली तरी नोंदणीचे काम सुरू आहे़ आवश्यक ती कागदपत्रे घेऊन विवाह नोंदणी करता येऊ शकते़ ही आता आवश्यक बाब झाली आहे़
- डॉ़ महेश मोरे,
आरोग्याधिकारी तथा विवाह नोंदणी अधिकारी, महापालिका, धुळे
कधी किती झाले नोंदणी विवाह?
२०१८ - २४०
२०१९ - १६०
२०२० - ८०
२०२१ जानेवारी - १६
२०२१ फेब्रुवारी - १४
२०२१ मार्च - १४
२०२१ एप्रिल - १६
२०२१ मे - १७
२०२१ जून - १०
२०२१ जुलै - १५