शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
4
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
5
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
6
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
7
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
8
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
9
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
10
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
11
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
12
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
13
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
14
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
15
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
16
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
17
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
18
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
19
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
20
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS

आशा सेविकेच्या माध्यमातून बालिकेला मिळाली ‘आई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 11:58 IST

प्रेरणा : सुरजा माळ या दुर्गम भागात राहणाऱ्या चिमा चौधरी आशासेविकेने पदरमोड करीत कुपोषित बालिकेला दिले जीवदान

आबा सोनवणे।आॅनलाइन लोकमतसाक्री : ‘हम दो हमारे दो’ अशी लहान कुटुंबाची व्याख्या असतानाही त्यांचेही पालन-पोषण न करणाºया सुसंस्कृत समाजाला चिमा मनोज चौधरी या आशा सेविकेने चपराक लगावली आह.आदिवासी समाजातील एका महिलेने आपल्या मनाची श्रीमंती दाखवून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.या महिलेची प्रेरणादायक कहाणी ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत साक्री तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात राहणारी सुरजा माळ या गावातील आशा सेविका चिमा मनोज चौधरी यांनी आई नसलेल्या मुलीचे पालनपोषण केले आहे. याच गावातील भारती चैत्राम चौधरी या महिलेचा प्रसुतीच्यावेळी मृत्यू झाला होता. तिला झालेली मुलगी कुपोषित होती. अशा परिस्थितीत सदर मुलीच्या वडिलांनी या मुलीला बेवारस सोडून काढता पाय घेतला. त्यामुळे मुलीचे काय असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना याच गावातील आशा सेविका चिमा चौधरी याच्यातील आई जागृत झाली. लहान बाळाचे हाल तिला पहावले नाही. तिने शेवटी त्या मुलीला आपल्या घरी नेले. तिची सुश्रुषा केली.त्या मुलीचं नाव तिने ‘राजश्री’ असे ठेवले आज ती मुलगी तिच्या कुटुंबातील एक सदस्य झाली आहे. पाच वर्षे वयाची राजश्री आता अंगणवाडीमध्ये जाऊ लागली आहे. पाचवर्षाची होईपर्यंत तिची विचारपूस करायला तिचे वडील आले नाहीत. शेवटी माझे हे तिसरे अपत्य समजून तिच्या पतीनेही तिचा स्वीकार केला. चौधरी दाम्पत्याला एक मुलगा एक मुलगी आहे. त्यांचेही पालन-पोषण या आ शा सेविका उत्तम रित्या करताहेत. एका आदिवासी समाजातील कमी शिकलेली महिला आज समाजात आदर्श म्हणून उभी राहिली आहे. तिच्या या कार्याची दखल आरोग्य विभागाने घेऊन तिचा सत्कारही करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जी.टी. सूर्यवंशी तसेच उपसभापती अ‍ॅड. नरेंद्र मराठे यांनीही या महिलेला आर्थिक मदत देऊ केली आह. आठ मार्चला महिला दिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा होईल. त्यावेळेस या धूमधडाक्यात महिला दिन साजरा करणाऱ्यांना ही ‘आशा’ दिसली तर बरे होईल. या मुलीचे पालन-पोषण करताना चिमा चौधरींना ज्या हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्या शब्दा पलीकडे आहेत. साक्री तालुक्यातील या सिंधुताई समाजधुरीणांच्या नजरेत येतील का हा खरा प्रश्न आहे .खºया अर्ताने चिमा चौधरी या अनाथांची माता बनली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे