रूग्णालय व परिसरात घाणीचे साम्राज्य झाल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना देखील आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रूग्णालयातील काही कर्मचारी रुग्ण व नातेवाईकांशी अरेरावी करीत असत्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. अशा वृत्तीच्या लोकांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा तसेच हिरे शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय आवारात आणि वार्डांमध्ये असलेल्या घाणीचे साम्राज्य कायमस्वरूपी दूर करण्यात यावे अशी मागणी मनपाचे नगसेवक युसुफ मुल्ला, माजी नगरसेवक साबीर, माजी नगरसेवक साजिद शाही, आमीर पठाण, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, धुळे महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, लिना काटे, मनिषा जगताप, युवा जिल्हाध्यक्ष वसीम अक्रम, जुनेद पठाण, सऊद सरदार, वसीम पिंजारी, मोईन शेख आदींनी केली आहे.
आठ दिवसात हिरे रूग्णालयातील घाणीचे साम्राज्य दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:42 IST