शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाई मिळवून द्या-सुभाष भामरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 10:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : वादळी वाºयामुळे धुळे तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नुकसानीचे पंचनामे ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वादळी वाºयामुळे धुळे तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करुन त्यांना योग्य ती भरपाई मिळवून द्यावी या आशयाचे निवेदन खासदार डॉ़ सुभाष भामरे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना सादर केले़ याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, प्रा़ अरविंद जाधव, सुनील सोनार, संजय पाटील, किशोर सिंघवी, देवेंद्र पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते़ मंगळवारी झालेल्या वादळामुळे धुळे तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये विजेचा पुरवठा खंडीत आहे़ वार, हरण्यामाळ, रावेर, फागणे, नांद्रे, सौंदाणे, लळींग, जुन्नेर, बोरकुंड आणि पाडळदे या गावांमधील काही घरांचे पत्रे उडाली आहेत़ शिरुड, वेल्हाणे येथे शेतकºयांनी उभारलेले पॉली हाऊस कोसळले आहे़ बºयाच गावांमध्ये शेडनेट हाऊसचे नुकसान झाले़ गुरे मृत्युमुखी पडली़ कांदा पिकाची हानी झाली़ एमआयडीसी येथील नुकसानीची माहिती शासनाला कळवावी़ दुष्काळाचा सामना करणाºया शेतकºयांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली़ 

सभापती-नगरसेवकात शाब्दिक चकमकखासदार डॉ़ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी दाखल झाले़ पदाधिकाºयांना घेऊन वाहने निघाली़ यात बाळापूरचे नगरसेवक संजय पाटील यांना वाहनात जागा नसल्याचे कारण सांगून दुर्लक्षित केल्यामुळे संतप्त झालेले नगरसेवक पाटील आणि स्थायी समिती सभापती युवराज पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली़ हा वाद चांगलाच रंगल्याने हा विषय चर्चेचा ठरला़ 

टॅग्स :Dhuleधुळे