शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गौरींचे आज होणार आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 11:46 IST

बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी  : तीन दिवस सुरू राहणार उत्सव

धुळे : ‘गौरी सोनपालवानं ये’ अशी आर्त साद घालत गुरूवारी अनेक भाविकांच्या घरी गौरींचे (महालक्ष्मी) आगमन होणार आहे. या सणाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. गौरींसाठी विविध आकर्षक दागिनेही महिला वर्गाला खुणावत आहे.सोमवारी अतिशय जल्लोषात गणरायांचे आगमन झाल्यानंतर त्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे गुरूवारी गौरींचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव व गौरी या दोन्ही सणांमध्ये सर्वात जास्त महत्व सजावटीला असते. त्यामुळे बुधवारी शहरातील बाजारपेठेत गौरीचे मुखवट्यांसोबतच सजावटीच्या साहित्यालाही मागणी होती.  महालक्ष्मीसाठी लागणारे विविध प्रकाराचे हार, मुकूट, पूजेचे आकर्षक सामान, वेगवेगळ्या प्रकारचे मखर, विविध प्रकारची तोरणे, अशा विविधरंगी वस्तुंनी बाजारपेठ फुलून गेली होती. मुखवटे ५०० रूपये जोडीप्रमाणे  मिळत होते.  याशिवाय कमरपट्टा, बाजूमल, नेकलेस, वेणी, गजरा, लक्ष्मीहार, नथमोती, आदी साहित्यांना मागणी होती. डेकोरेशनची फुलमाळ ५० रूपयांपासून २०० रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गौरी-गणपतींसाठी अनेक प्रकारचे आकर्षक दागिने महिला वर्गाला खुणावत होते.महालक्ष्मीचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. त्यामुळे गुरूवारी सकाळी गौरींची विधीवत स्थापना केली जाईल.  शुक्रवारी  अभ्यंगस्थान करून ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींची विधीवत पूजा केली जाईल. या सणानिमित्त महिला पारंपारिक खेळ खेळण्याची धुळ्यात परंपरा आहे.

टॅग्स :Dhuleधुळे