शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात गाव कारभा-यांचा ‘लोकमत’तर्फे गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:31 IST

लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्डसचे थाटात वितरण : धुळ्याच्या सन्मान सोहळ्यात भारावून गेले १३ सरपंच

ठळक मुद्देजिल्ह्यातील ११३ सरपंचांची उपस्थिती. कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक सरपंचांना दिली भेटवस्तू जिल्ह्यातील १३ उत्कृष्ट सरपंचांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाड्याचा कारभार करणाºया धुळे जिल्ह्यातील १३ सरपंचांना सोमवारी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत’ सरपंच अ‍ॅवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. शहरातील छत्रपती राजर्षी शाहू  महाराज नाट्यमंदिरातील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावागावांतील विकास कामांची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाºयांना बीकेटी टायर्स प्रस्तूत ‘लोकमत’ सरपंच अ‍ॅवॉर्ड्स २०१७ ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला. पतंजली आयुर्वेद हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर महिंद्रा ट्रॅक्टर्स हे सहप्रायोजक होते. यावेळी राज्याचे रोहयो व पर्यटमंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सवव्यवसाय मंत्री महादेव जानकर, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे,  जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, सामाजिक कार्यकर्त्या इंदिराताई पाटील (विटनेर, ता. चोपडा), बीकेटीचे वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद सप्तकोटेश्वर, साहाय्यक व्यवस्थापक झुबेर शेख, बीकेटी टायर्सचे वितरक राहुल दुत,  महिंद्राचे वितरक जगदीश बागुल, महिंद्राचे टेरीटरी मॅनेजर योगेश लोंढे ‘लोकमत’चे महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा, ‘लोकमत’चे  निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व ‘लोकमत’ चे धुळे जिल्हा प्रमुख राजेंद्र शर्मा आदी उपस्थित होते.  पहिल्या वर्षी केलेल्या आवाहनाला धुळे जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. यासाठी जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाºया सरपंचांनी मोठ्या प्रमाणाहून अधिक प्रस्ताव सादर करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल बाबूजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कारावेळी माहितीची चित्रफीत दाखविण्यात आली. हे पाहून सरपंचांसह उपस्थित भारावून गेले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन वाहीद अली यांनी केले.