शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

रहिमपुरा गावात गॅस सिलेंडरचा स्फोट, जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 15:47 IST

दोन घरे जळून खाक, संसारोपयोगी साहित्य जळून खाक, लाखोंचे नुकसान

दोडाईचा : गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन रहिवाशी घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील रहीमपुरे येथे बुधवारी रात्री घडली. यात किमान २१ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ सुदैवाने जीवितहानी टळली़शिंदखेडा तालुक्यातील रहीमपूरे येथे बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास निंबा नथा पाटील व विश्वास गोरख पाटील यांचा राहत्या घराला आग लागली़ निंबा नथा पाटील यांचे २ लाख १० हजार रुपये किमतीचे घर जळून खाक झाले. घरातील आगीत ७ लाख रुपयांची रोकड, १ लाख २० हजार रुपये किमतीचे २४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३० हजार रु किमतीचा टीव्ही, फ्रीज, फॅन व १३ हजार रुपये किमतीचे हरभऱ्याचे बियाणे, २ लाख १० हजार रुपये किमतींच्या घरातील वस्तू आगीत जळून खाक झाल्यात. आगीत निंबा पाटील यांचे घरासह १२ लाख ८३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच याच घराला लागून विश्वास गोरख पाटील यांचे घर होते. या आगीत २ लाख १० हजार रु किमतीचे घर, १ लाख ५० हजार रुपयांची रोकड, ३० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, १ लाख ५० हजार रुपये किमतीचे ३ तोळे सोन्याचे दागिने, ३० हजार रु किमतीची ५ ग्रॅमची अंगठी, १३ हजार रु किमतीची चक्की, ३० हजार रु किमतीचा फ्रीज, टिव्ही, ५ हजार रु किमतीचा फवारणी पंप, १ लाख ९० हजार रु किमतीचे घरघुती व गृहपयोगी साहित्य, २२ हजार ८०० रुपये किमतीचे रासायनिक खत आगीत जळून खाक झाले. आगीत विश्वास पाटील यांचे ८ लाख ४२ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दोन्ही घरे व घरातील साहित्य आगीत जळून २१ लाख २५ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.आगीच्या घटनेची माहिती मिळताच अपर तहसीलदार सुदाम महाजन, कामराज निकम, पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, सहायक पोलीस निरीक्षक डॉ संतोष लोले, सर्कल महेशकुमार शास्त्री आदींनी घटना स्थळी भेट दिली. दोंडाईचा व शिंदखेडा येथील अग्निशमन बंबाने आग विझवली. दरम्यान दोन्ही घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून भस्म झालीत. गुरुवारी तलाठी दीपक ईशी यांनी पंचनामा करून झालेल्या नुकसानीचा अंदाज केला.

टॅग्स :Dhuleधुळे