शहरं
Join us  
Trending Stories
1
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
2
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
3
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
4
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
5
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
6
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
7
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
8
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
9
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
10
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
11
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
12
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
13
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
14
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
15
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
16
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
17
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
18
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
19
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
20
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
Daily Top 2Weekly Top 5

फक्त महिलांसाठी असणार बगिचा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 12:15 IST

शिरपूर-वरवाडे न.पा.चा पुढाकार : राज्यातील अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर :  येथील नगरपालिकेच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर-वरवाडे नगर पालिकेतर्फे फक्त महिलांसाठी असलेल्या बगीच्याचे (इव्ह पार्क) लोकार्पण गुरुवार ४ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात येत आहे. राज्यातील अभिनव हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. शिरपूर शहरातील वॉर्ड क्रमांक २ मध्ये  जयश्रीबेन पटेल यांच्या संकल्पनेतून महिलावर्गाासाठी अतिशय उत्कृष्ट असे इव्ह पार्क हा नावीन्यपूर्ण बगीचा उपलब्ध करून देण्यात आला आहे.शहरात श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, मुकेशभाई पटेल रिक्रिएशन गार्डन, अ‍ॅम्युजमेंट पार्क, नानानानी पार्क यानंतर आता इव्ह पार्क हे खास महिलांसाठी असलेले उद्यान शिरपूरकर यांच्या सेवेसाठी खुले करण्यात येणार आहे.या इव्ह पार्क महिलांसाठी बनविण्यात आलेल्या गार्डनसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातून संरक्षक भिंत व इतर बाबींसाठी खर्च करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या फंडातून पाच लाख रुपये ओपन जीम साहित्य व इतर बाबी साठी खर्च केला आहे. एकूण २० लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे एस. व्ही. के. एम. संस्था एन. एम. आय. एम. एस. मार्फत सहकार्य करण्यात आले. त्यांच्यामार्फत विविध फुलझाडे, शोभेची महागडी रोपे व इतर खर्चिक बाबींसाठी योगदान देण्यात आले आहे. २५हजार स्क्वे. फूट जागेवर हा इव्ह पार्क उभारण्यात आला आहे. तेथे महिलांसाठी गुजरात येथून महागडी रोपे, खास बैठक व्यवस्था करण्यात आली असून येथे जॉगिंग ट्रॅक, लॉन्स, योगासाठी खास सोय, चर्चासत्र व विविध कार्यक्रम साठी व्यवस्था, चांगली लाईट व्यवस्था, शौचालय इत्यादी उपलब्ध केले आहे. महिलांसाठी गार्डन सकाळी व संध्याकाळी ५ ते ९ यावेळेत खुले राहिल.  येथे नेहमी सिक्युरिटी व गार्डनर राहतील. महाराष्ट्र राज्यातील अभिनव अशा या नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे