शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोला लागली पुन्हा आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:39 IST

महापालिका : वरखेडी रोडवर गंभीर स्थिती, धुरामुळे जाणवतोय सर्वांना त्रास

धुळे : शहरातील वरखेडी रोडवर असलेल्या कचरा डेपोला गुरुवारी सायंकाळी अचानक आग लागली़ शुक्रवारी दुपारपर्यंत आगीच्या ज्वाला आणि धूर निघत असल्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला़  कचरा डेपोला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे़ हा विरोध वेळोवेळी नागरिकांनी महापालिकेकडे व्यक्त केला आहे़ आगीच्या धुरामुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाही़ त्यामुळे  अनेक अपघात झाले आहे़  तर काहींना जीवदेखील गमवावा लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मनपास कचरा टाकण्यासाठी दुसरा पर्याय नाही़ त्यामुळे संपूर्ण शहराचा कचरा येथे टाकला जातो़ कचरा जास्त व जागेचा अभाव यातून मार्ग निघावा यासाठी आग लावली जात असावी, अशी शक्यता आहे़ त्यामुळे कचरा जळून कमी झाल्यावर जागेची अडचण दूर होते़ त्यामुळे बाराही महिने धगधगणाºया कचरा डेपोचे आगीचे कारण गुलदस्त्यात असल्याचे समोर येत आहे़ वरखेडी गावापासून दोन-तीन किमी अंतरावरील डेपोला नागरिकांचा विरोध असतानाही मनपाने नागरिकांचे प्रश्न न सोडविता दुर्लक्ष केले आहे़ परिसरात कचरा डेपोमुळे सतत जाणवणारी तीव्र दुर्गंधी, दूषित झालेले पाणी व डेपोवर कायम वावरणाºया मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागते़ डेपोजवळ दिव्यांची व्यवस्था नाही. शहर परिसरातील मृत जनावरेही येथे आणून टाकली जातात. कचरा डेपोला बाराही महिने आग लागतेच कशी? हे समजू शकलेले नाही़ आतापर्यंत किती वेळा आग लागली असावी, याबाबत कुठलीही नोंद नाही़समस्या कधी सुटणाऱ़़पूर्वीच्या काळी कचरा डेपोमध्ये इतक्या प्रमाणावर कचरा संकलन होत नव्हता़ पण, सध्याच्या काळात शहराचा वाढणार विस्तार लक्षात घेता याच कचºयाच्या डेपोमध्ये त्याचे प्रमाण कितीतरी पटीने वाढलेले दिसते़ याचा सर्वाधिक त्रास या रस्त्यावरून वावरणाºया नागरिकांना आणि याच परिसरात राहणाºया नागरिकांना भोगावा लागत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे