धुळे : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरूस्ती केली जात आहे. रुग्णालयाच्या आवारात मोठ्याप्रमाणात कचरा जमा झाल्यामुळे अस्वच्छता वाढली होती. त्यामुळे शिवसेनेतर्फे शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत दोनशे जण सहभागी झाले. ३० ट्रॅक्टर कचरा संकलित करण्यात आला. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाचे चक्करबर्डी येथे मार्च २०१६ मध्ये स्थलांतर झाले. त्यामुळे जुन्या जिल्हा रुग्णालयाची इमारत धूळखात पडून होती. याठिकाणी नवीन रूग्णालय सुरू करावे, अशी मागणी माजी आमदार शरद पाटील यांच्यासह शिवसेनेने केली होती. या वेळी माजी आमदार शरद पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, उपजिल्हा प्रमुख धीरज पाटील, कैलास पाटील, महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, डॉ.सुशील महाजन, भूपेंद्र लहामगे, हेमाताई हेमाडे, रवींद्र काकड, प्रफुल्ल पाटील, इलियास अन्सारी, संदीप सूर्यवंशी, मच्छिंद्र निकम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, अतिरिक्त जिल्हा डॉ.संजय शिंदे, डॉ. नितीन पाटील, डॉ. दिनेश दहिते, डॉ. रवी सोनवणे आदी सहभागी झाले.
इमारतीला रंगरंगोटी गेल्या काही दिवसांपासून इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम वेगात सुरू आहे. इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. या ठिकाणी रुग्णालय सुरू झाल्यावर नागरिकांची सोय होणार आहे.या इमारतीत १०० खाटांचे सर्वोपचार व १०० खाटांचे नवजात शिशू व महिला रुग्णालय मंजूर झाले आहे. इमारतीच्या आवरात मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता.