शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

गणेश मूर्तींचे दर ८ ते १० टक्क्यांनी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 13:35 IST

मूर्ती तयार करण्यात कारागीर व्यस्त :  आतापासूनच बुकिंग फुल्ल

ठळक मुद्देकच्चा मालाचे दर वाढल्याने, मूर्ती महागणारमूर्तींचे बुकींग जवळपास पूर्णमातीच्या मूर्तींचे दर स्थिर राहणार

आॅनलाइन लोकमतधुळे :  विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाला अजून दीड महिना बाकी आहे. मात्र यावर्षी होत असलेला समाधानकारक पाऊस, आगामी काळात येणाºया निवडणुकांमुळे गणेशोत्सव गेल्या वर्षाच्या तुलनेत जल्लोषात साजरा होण्याचे संकेत आहे. त्यामुळे आतापासूनच काही मूर्तिकारांकडे बुकिंग पूर्ण झालेले आहे. जीएसटीमुळे यावर्षी ८ ते १० टक्क्यांपर्यंत मूर्तींच्या किमतीत वाढ होईल, असे कारागिरांनी सांगितले.चातुर्मास सुरू होताच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते. त्यातच गणेशोत्सवाचे सर्वांनाच वेध लागलेले असतात. यावर्षी हा उत्सव १३ ते २३ सप्टेंबर २०१८ या कालावधीत साजरा होणार आहे.गणरायाच्या आगमनाला अजून दीड महिन्याचा अवकाश असला तरी मूर्ती कारागिरांकडे मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आलेला आहे. आता प्लॅस्टर आॅफ पॅरिसद्वारेच मूर्ती तयार करण्यावर भर दिला जात आहे.बुकिंग पूर्ण आकर्षक मूर्ती व कार्यकर्त्यांना हवी असलेली मूर्ती कारागिरांकडून तयार करून घेणाºयांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. त्यामुळे शहरातील मूर्ती विक्रेत्यांकडे आतापासूनच मूर्ती विकत घेण्यासाठी बुकिंगला सुरुवात झाली आहे. काही कारागिरांकडे तर मूर्तींची बुकिंग पूर्ण झालेली आहे. ज्यांनी मूर्ती बुकिंग केली त्यांनाच पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले. शहरासह मालेगाव, चाळीसगाव व तसेच लगतच्या गुजरात राज्यातूनही गणेश मूर्ती नोंदणीसाठी कार्यकर्ते शहरात येत असतात. कच्चा मालाच्या किमती वाढल्यागेल्या वर्षापासून  जीएसटी लागू झाल्यामुळे गणेश मूर्ती साकारण्यासाठी लागणारे प्लॅस्टर आॅफ पॅरिस, रंग, माती, नारळाच्या चुट्ट्या व इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे  गणेश मूर्तींच्याही किमती ७ ते १० टक्क्यांनी वाढणार आहे. घरगुती गणपतीच्या मूर्तीपेक्षा मोठ्या गणेश मूर्तींसाठी गणेशभक्तांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. भोलाशंकर मूर्तीला मागणीयावर्षीही मंडळांकडून विविध प्रकाराच्या मूर्तींना मागणी होऊ लागली आहे. त्यात दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा यांच्यासह अल्फा गणेश, रावण वध, श्रीरामाच्या पोजमधील गणेशमूर्तीला मागणी आहे. त्याचबरोबर भोले शंकर रूपातील मूर्तीला मंडळांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे मूर्ती कारागीर गिरीश खरे, संजय खरे यांनी सांगितले.  

 

टॅग्स :Dhuleधुळे