शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मूर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 21:19 IST

बाजारपेठेत चैतन्य : पोळा सणानिमित्त वस्तू खरेदीसाठी शेतकºयांचा उत्साह; तयार गणेश मूर्ती नेण्यास सुरुवात

ठळक मुद्देगेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. अद्याप आमच्या परिसरात समाधानकारक पाऊस नाही. आम्ही पावसाच्या प्रतीक्षेत आहोत. वर्षातून आमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पोळा सणानिमित्त आम्ही खरेदीसाठी बाजारपेठेत आलो आहोत. -सीताराम वाणी, शेतकपारोळा रोड व मोहाडी परिसरात गणेश मूर्ती तयार करणाºया कारखान्यात आतापर्यंत तयार झालेल्या गणेश मूर्ती नंदुरबार, शहादा, जळगाव जिल्ह्यातील रावेर, अमळनेर, चोपडा, पारोळा या ठिकाणी विक्रीसाठी रवाना झाल्याची माहिती तेथील विक्रेत्यांनी दिली आहे.धुळे शहरात विविध मंडळांचे कार्यकर्ते वर्गणी गोळा करण्यासाठी घरोघरी, परिसरातील दुकाने, कार्यालयांमध्ये जाताना दिसत आहे. तसेच गणेशोत्सवाच्या काळात प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीनेही अनेक मंडळांचे कार्यकर्ते प्रयत्नशील असून, जुने धुळे भागातील काहीशहरातील इंदिरा गार्डन परिसरात प्रिन्स मित्र मंडळाने गेल्या महिन्यातच ‘आतुरता आगमनाची’ असा फलक लावला होता. त्यानंतर याच परिसरातील वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या सदस्यांनी लाडक्या बाप्पाचे आगमन लवकरच होणार, असा फलक लावला असून त्या फलकातून ‘स्वच्छ भारत’चा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मूर्तिकारांचे गणेश मूर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर शहरासह जिल्हाभरातून मूर्तींची नोंदणी काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक महिन्यापूर्वीच करून ठेवल्याने तयार गणेश मूर्ती काही गणेश भक्त आतापासूनच नेताना दिसत आहेत. दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी येणाºया पोळा सणानिमित्तही बाजारपेठेत खरेदीसाठी शेतकºयांची रविवारी गर्दी दिसून आली. गेल्या दोन दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने पोळा सणानिमित्त लागणाºया वस्तू खरेदी करताना शेतकºयांमध्ये उत्साह दिसत आहे. लाडक्या गणरायाचे २५ आॅगस्टला आगमन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मोहाडी परिसर, साक्री रोड, पारोळा रोड, नगावबारी परिसरातील मूर्तिकार गणेश मूर्तींना रंग देण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत. दरम्यान, धुळे शहरातील पाचकंदील परिसर ते फुलवाला चौकापर्यंत सजावटीसाठी लागणाºया साहित्यांचीही दुकाने विक्रेत्यांनी थाटली असून अनेक भाविक आतापासूनच खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहेत. ३० टक्के मूर्ती महागणार जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू  झाला. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्ती ३० टक्क्यांनी महागणार आहेत, अशी माहिती मूर्तिकार अनिल पवार, संतोष चौधरी, किरण पाटील यांनी दिली. जीएसटीमुळे गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे रंग, माती व इतर साहित्यांच्या किमती यंदा वाढल्या आहेत. हे साहित्य बाहेरून आयात करावे लागते. त्यासाठी यंदा जादा पैसे गणेश मूर्ती तयार करणाºया मूर्तिकारांना मोजावे लागले. परिणामी,  यंदा गणेश मूर्तींच्या किमती वाढतील, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.वस्तू खरेदीसाठी शेतकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पोळा सणही अवघ्या दोन आठवड्यांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकºयांची बाजारपेठेत वस्तू खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. त्यात गेले वर्षभर कांद्याचे दर कोसळलेले असताना दोन दिवसांपासून कांद्याला अपेक्षित भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदी झाला असून, शेतकरी मोठ्या उत्साहात वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. धुळे शहरातील पाचकंदील परिसरात पोळा सणासाठी लागणारे नाथ, दोर, गोंडा, मोरखी, पैंजण, जोतर, गजरा, बाशिंग आदी साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहे. वस्तू खरेदीसाठी शेतकºयांचा उत्साह दिसत असल्याची माहिती विक्रेते हेमंत अग्रवाल यांनी दिली आहे.