शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खड्डयात वृक्षारोपण करून ग्रामस्थांची गांधिगिरी, वाडी ते नांदर्डे रस्ता खराब असल्याने आंदोलन

By अतुल जोशी | Updated: October 2, 2023 17:15 IST

अतुल जोशी, धुळे : शिरपूर तालुक्यातील वाडी ते नांदर्डे या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने, वाहनधारकांना या ...

अतुल जोशी, धुळे: शिरपूर तालुक्यातील वाडी ते नांदर्डे या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने, वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहने नेताना कसरत करावी लागते. याबाबत संबंधित विभागाला निवेदन देऊनही खड्डे न बुजविल्याने, अखेर ग्रामस्थ व भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे शिरपूर तालुकाध्यक्ष ओंकार पवार यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधत खड्डयांमध्येच वृक्षारोपण करून ‘गांधिगिरी’केली.

शिरपूर तालुक्यातील  शिरपूर ते बोराडी दरम्यान असलेल्यावाडी पिरबाबा दर्गा ते  नांदर्डे नर्सरी पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.  मात्र या रस्त्यावरील खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप वाहनचालक तसेच स्थानिक ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी केला आहे.  रस्ता दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करीत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांसह नागरिकांनी संताप व्यक्त करीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी रस्त्यावरील खड्ड्यात गांधीगीरी करत खड्डयात वृक्षारोपण केले.

यावेळी पिंटू उर्फ गणेश बडगुजर,संजय पावरा,रविंद्र  बंजारा,सुनील पावरा,अक्षय पावरा,सुनिल बंजारा,अनिल पावरा,अक्षय पावरा, आदी उपस्थित होते.

टॅग्स :DhuleधुळेMahatma Gandhiमहात्मा गांधी