शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात गजानन कॉलनी पोलीस चौकीचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 22:40 IST

पोलीसच समन्वय घडविणार : उदघाटनप्रसंगी एम.रामकुमार

ठळक मुद्देपोलीस चौकीचे नव्या जागेत स्थलांतरअत्याधुनिक यंत्रणाने सुसज्ज चौकीपोलीस अधिकारींसह राजकीय पदाधिकारी, नागरिक उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अतिसंवेदनशिल भाग म्हणून आजही गजानन कॉलनी परिसराकडे पाहण्यात येते़ ही निर्माण झालेली ओळख पुसून टाकण्याची जबाबदारी या भागातील नागरिकांची आहे़ येथे तयार झालेली पोलीस चौकी दोन समाजात समन्वय घडविण्याचे काम निश्चित करेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी व्यक्त केला़ गजानन कॉलनीत नव्याने तयार झालेल्या पोलीस चौकीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते़ शहरातील गजानन कॉलनी भागात मागील काही वर्षापूर्वी झालेली दंगल लक्षात घेता पोलीस चौकी तयार झाली होती़ दरम्यानच्या काळात पुन्हा या भागात तणाव निर्माण झाल्याने या चौकीचे गजानन कॉलनीत स्थलांतर करण्यात आले़ यावेळी अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव, गुन्हे अन्वेषण शाखेचे उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, धुळे शहर निरीक्षक दिलीप गांगुर्डे, देवपूरचे निरीक्षक आनंद निकम, चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांच्यासह माजी महापौर जयश्री अहिरराव, कमलाकर अहिरराव, प्रदीप कर्पे, महेश मिस्तरी, भुपेंद्र लहामगे, शरद वराडे, भिकन वराडे, शव्वाल अन्सारी व नागरिक उपस्थित होते़ नव्याने तयार झालेली ही चौकी या भागात सेतू म्हणून काम करेल, असा विश्वास पानसरे यांनी व्यक्त केला.