शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाला निधी कमी पडू दिला जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 21:58 IST

प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन; पं.स.सदस्य सतिष पाटील यांनी घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेस निधी मिळावा या संदर्भात गेल्या बुधवारी विधान भवनात माजीमंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्यासोबत पंचायत समितीचे सदस्य सतिष पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाला निधि कमी पडू देणार नाही. तसेच ही योजना लवकरात लवकर पंतप्रधान कृषि सिंचाई योजनेत समाविष्ट करण्यासाठी आदेश केलेत. तसेच गुरुदत्त उपसा सिंचन व महात्मा फुले सिंचन या लिफ्टला लवकर निधि उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.या योजनेमुळे शिंदखेडा, नंदूरबार, साक्री तालुक्यातील किमान १०० ते १५० गवांचा सिंचनाचा प्रश्न कायम स्वरूपी सूटणार आहे. १९८४ साली दांडेकर समितीच्या अहवालात ८७ दुष्काळी तालुक्यांची यादी दिली आहे. त्यात शिंदखेडा, नंदुरबार, साक्री तालुक्यातील पूर्व भाग यांचा समावेस आहे. त्यात जलसिंचन योजना उपलब्ध करून देण्याचे राज्य व केंद्र शासनाचे धोरण आहे.१९९९ साली प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेस मान्यता मिळाली. तापी नदीच्या पुरात वाहून जाणारे पाणी पंपग्रुह बांधून लोखंडी पाईपद्वारे उचलून चार टप्प्यात टाकावे. या योजनेमुळे नंदूरबार तालुक्यातील पूर्व भाग शिंदखेडा तालुक्यातील छोटा अमरावती, मालपुर येथील अमरावती धरण, वाडीशेवाडी धरण, तसेच ह्या धरणांमुळे चिमठाणे, शिंदखेडा व विखरण तलाव भरणार आहेत. शनिमांडळ लघुपाटबंधारे योजना व प्रस्तावीत निंभेल व आसाने या लहान योजनांद्वारे पाणी मिळणार आहे.ही योजना सुरुवातीला बुराई धरणाची उंची वाढवूनही खालची धरण भरणार होती. बुराई धरणाची ऊंची वाढवली तर साक्री तालुक्यातील आखाडे व फोफरे ही गावे कायमस्वरूपी उठणार होती व यासाठी गावांचा विरोध होता. शासनालाही खर्च जास्त येणार होता. आम्ही २०१४ साली या योजनेत बदल करण्यात आला. तो असा हाटमोहिदा वरुन पंपींग करून एका बाजूने येणारे आसाने, निभेल साठवण तलाव, बलदाणे धरण, अमरावती धरण, वाडीशेवाडी धरण, बुराई धरण, शनिमांडळ धरण त्या ठिकाणीवाल ठेऊन धरण भरून घ्यायची मंजूरी मिळून घेतली. आतापर्यंत फक्त ३० ते ३६ टक्के काम झाले आहे. ५५ कोटी खर्च झालेले आहे. गेल्या चार वर्षापासून समितीच्या माध्यमातून वेगवेगळी आदोलन सुरु आहेत. या योजनेला गती व निधि देण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे