शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपी जळगावला जेरबंद धुळ्याच्या पथकाची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 22:35 IST

न्यायालयीन होता बंदिवान : खून प्रकरणातील संशयित

धुळे : खून प्रकरणातील संशयित धुळ्यातील तात्पुरता कारागृहात ठेवण्यात आले होते़ खिडकीचे गज तोडून फरार झालेल्या संशयिताला धुळ्याच्या पथकाने जळगाव येथे जावून अटक केली़ सुरेश जुमान पावरा असे त्या संशयिताचे नाव आहे़शिरपुरातील करवंद नाक्यावर दोन महिन्यापुर्वी एकाचा खून केल्याप्रकरणी सुरेश जुमान पावरा (रा़ जुना करवंद रोड, कळमसरे ता़ शिरपूर) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्याला धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातंर्गत तात्पुरते कारागृह जिजामाता कन्या हायस्कूल येथे ठेवण्यात आले होते़ तो न्यायालयीन बंदिवान होता़ २२ जून २०२० रोजी पहाटे २ ते अडीच वाजेच्या सुमारास खिडकीचे गज तोडून तो फरार झाला होता़ पुन्हा त्याच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्याचा शोध सुरु असतानाच तो जळगाव येथे येणार असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली़ माहिती मिळताच पथकाने जळगाव येथे जावून सुरेश जुमान पावरा याच्या मुसक्या आवळल्या़ त्याला ताब्यात घेऊन धुळ्यात आणण्यात आले़ त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली़पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, तपास पथकाचे कर्मचारी मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, अविनाश कराड, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, सचिन पगारे यांनी ही कारवाई केली़

टॅग्स :Dhuleधुळे