शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कंपनीच्या माध्यमातून फसवणूक

By admin | Updated: February 5, 2017 00:21 IST

आऱडी़, एफ़डी.च्या नावे आमिष दाखवून पैसे घेतल्यानंतर ते परत न करता नागरिकांची 9 लाख 75 हजार 300 रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आह़े

धुळे : बनावट कंपनी तयार करून वेगवेगळे प्लॉट पाडून त्या माध्यमातून आऱडी़, एफ़डी.च्या नावे आमिष दाखवून पैसे घेतल्यानंतर ते परत न करता नागरिकांची 9 लाख 75 हजार 300 रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आह़े याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने कंपनीसह नऊ जणांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याबाबत हरिश्चंद्र खंडू बडगुजर (वय 55, रा़ नारायण मास्तर चाळ, चित्ताेड रोड, धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार सुमित भारती याने भारतीयाज ट्रेड अॅन्ड सव्र्हिसेस प्रा़ लि. या कंपनीची स्थापना करून त्यात इतर स्वत:सह आठ जणांना संचालक, फिल्ड ऑफिसर व एजंट बनविल़े तसेच भारतीयाज ट्रेड अॅन्ड सव्र्हिसेसच्या नावे वेगवेगळे प्लॉट तयार केल़े ते हरिश्चंद्र बडगुजर यांच्यासह त्यांची मुले व नातेवाइकांना आऱडी, एफ़डी.चे नावे आमिष दाखवून  9 लाख 75 हजार 300 रुपये जमा केल़े त्यानंतर जमा केलेले हे पैसे परत न करता कंपनीसह नऊ जणांनी विश्वासघात, सामाईक कटकारस्थान करून बनावट कंपनी तयार करून आर्थिक फसवणूक केली़ हा प्रकार 1 फेब्रुवारी 2011 ते 10 जानेवारी 2016 दरम्यान शहरातील ऐंशी फुटी रस्त्यावरील श्री व्यंकटेश प्लाझा येथे घडला़  याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने भारतीयाज ट्रेड अॅन्ड सव्र्हिसेस प्रा़ लि,बारापत्थर, गोल बिल्डिंग, धुळे, चेअरमन सुमित अमित भारती, चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर अफरोज अमित भारती (रा़ प्लॉट नं 665, आसर नगर, सूर्यमंदिरजवळ), डायरेक्टर नसीर अरिमखान पठाण (रा़ वडजाई रोड, हजर अबुबखरच्या मशिदीच्या पाठीमागे), चंद्रप्रकाश पाटील (रा़ मोगलाई), जाकीर रमजान  शेख (रा़ 18 टी हजारखोली, चाळीसगाव  रोड), अशपाक शेख (रा़ अलहेरा हायस्कूलजवळ), हेमंत रामदास पाटील (रा़ प्लॉट नं 84, कुणाल सोसायटी, साक्री रोड) व फिल्ड ऑफिसर कुमुदिनी साबळे (रा़ सिध्दार्थनगर, चित्ताेड रोड) यांच्याविरुध्द आझादनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 409, 420, 468, 471, 120 ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े