शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

वाहनाच्या धडकेत कोल्हा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 22:33 IST

शिरपूर येथील घटना : अधिक उपचारासाठी मुंबईला केले रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळील बिजासन पोलिस चौकीजवळ एका अज्ञात वाहनाने काकोटी प्रजातीच्या कोल्ह्यास धडक देवून जखमी केले होते़ मात्र त्यास अधिक उपचारासाठी  मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथे प्राणी सश्रुषा केंद्र व पुनर्वसन केंद्र येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. गेल्या आठवड्यात पळासनेर गावाजवळ एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत काकोटी प्रजातीचा कोल्ह्यास धडक दिली होती. त्यात तो कोल्हा गंभीर जखमी (कमरेस जबर दुखापत) झाला होता़  त्या वन्यप्राण्याला त्वरित सातपुडा वन्यजीव संरक्षण समितीचे अध्यक्ष लकी जगदेव, अरविंद जमादार व अंकित जैन यांनी वनविभागाच्या मदतीने डॉ.सईद मनेर, डॉ.कुवर, प्राणीमित्र दिनेश तिवारी व उत्कर्ष जैन यांच्याकडे उपचारासाठी घेऊन गेले़  नंतर त्या वन्यप्राण्यांचा पुढील उपचार सांगवी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ़सईद यांचे मार्फत लकी जगदेव यांच्याकडे सुरू होते.  परंतु कोल्ह्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यास अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेण्याचे ठरविण्यात आले़ २८ रोजी जखमी कोल्ह्याची वैद्यकीय तपासणी डॉ़सईद यांनी केली. तो पुढील प्रवासासाठी तंदुरुस्त असल्याने त्यास मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे प्राणी शुश्रुषा केंद्र व पुनर्वसन केंद्र येथे रवाना करण्यात आले़ यावेळी सांगवी वन विभागाचे वनक्षेत्रपाल डी.एम. शरमाळे, वनपाल सांगवी डी.आर. जिरे, वनरक्षक एस.बी.इंडे, जी.एस. बारीस, वनमजुर भोजु पावरा तसेच सातपुडा वन्यजीव संरक्षण समिती पळासनेर येथील अध्यक्ष प्राणीमित्र लकी जगदेव, अरविंद जमादार, अंकित जैन, महेंद्र कोळी, विकास जगदेव, सनी महाले, निशिगंध पवार, मयुर जाधव, प्रमोद शिरसाठ आदी उपस्थित होते.  वाहनाने दिलेल्या धडकेत कोल्हा गंभीर जखमी झाला होता, स्थानिक उपचार करूनही प्रकृती सुधारत नसल्यामुळे अधिक उपचारासाठी मुंबईला पिंजरा गाडीत नेवून प्राणी शुश्रुषा केंद्रात ३० रोजी स्वत: नेले़ त्यानंतर त्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले जाणार आहे़-डी़एम़ शरमाळेवनक्षेत्रपाल, सांगवी

टॅग्स :Dhuleधुळे