शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या चौकशीतून चार मोटारसायकलीचा शोध; शहर पोलिसांची कारवाई

By देवेंद्र पाठक | Updated: November 4, 2023 17:25 IST

ताब्यातील तरुणाची चौकशी

देवेंद्र पाठक, धुळे: चोरीला गेलेल्या मोटारसायकलीची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होताच शहर पोलिसांच्या शोध पथकाने तपासाची चक्रे फिरविली आणि एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरलेल्या चार मोटारसायकली पोलिसांना काढून दिल्या. दरम्यान, त्याच्या विरोधात पोलिसात नोंद घेण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. आणखी मोटारसायकली त्याच्याकडून मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धुळ्यातील संगमा चौक, कृषी नगरात राहणारे दिलीप गिरधर लोथे यांची एमएच १८ एजी ६५२१ क्रमांकाची दुचाकी चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. त्यांनी गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली. शहर पोलिसांच्या शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, कर्मचारी विजय शिरसाठ, दिनेश परदेशी, कुंदन पटाईत, रवींद्र गिरासे, महेश मोरे, मनीष सोनगीरे, प्रवीण पाटील, वसंत कोकणी, तुषार पारधी, अमित रनमळे, अमोल पगारे यांनी आपली कसब पणाला लावली.

सुरत बायपासवर राहणाऱ्या एका तरुणाने ही दुचाकी मालेगाव येथे विक्री करण्यासाठी घेऊन गेलेले होते. परंतु त्याच्याकडे गाडीचे कागदपत्र नसल्याने त्याला गाडी विकता आली नाही. त्याने चोरीची गाडी सुरत बायपास येथील हॉटेल चंद्रदीपच्या मागे मोकळ्या जागेत दुचाकी लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहिती मिळताच तरुणाला जेरबंद करुन त्याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांना संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरलेली दुचाकी काढून दिली शिवाय अन्य ४ दुचाकी देखील काढून दिल्या. त्याची किंमत १ लाख १ हजार इतकी आहे.

टॅग्स :Arrestअटक