शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळाच्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 22:04 IST

दोंडाईचा : सातव्या दिवशी सारंगखेडा येथे तापीत केले बाप्पाचे विसर्जन

दोंडाईचा : गणपती बाप्पा मोरया ,पुढचा वर्षी लवकर या .....अशा जयघोषात  मोठ्या भावपूर्ण वातावरणात रविवारी  सात दिवसासाठी विराजमान झालेल्या  ३३ सार्वजनिक मंडळ व  घरगुती अशा सुमारे २२० गणेश मूर्र्तींचे   वाजत गाजत ,ढोल-ताशाचा गजरात शेकडो भाविकांनी सारंगखेड़ा येथील  तापी नदीत विसर्जन केले. दरम्यान मोठया पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जसन शांततेत झाले.हरीहर भेट - दोंडाईचा येथील आझाद चौकात  दादा गणपति व बाबा गणपती  आणि विरभगतसिंग  गणपती गणेश मंडळाची समोरासमोर भेट होते.  ती भेट पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी आझाद चौकात असते. नेहमीप्रमाणे ही भेट आज  दुपारी ४ वाजेच्या सुमारास झाली. यावेळी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत गुलाल, फुलांची उधळण करीत ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.  हरिहर भेटीनंतर जामा मशीद मार्गे एक एक गणपती विसर्जनाकडे मार्गस्थ झाला. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर   सर्व ठिकाणी  कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.    दोंडाईच्याची  संवेदनशील शहरात गणना होत असल्याने  मोठा पोलिस बंदोबस्त  ठेवण्यात आला होता. विसर्जन मिरवणुकीत  कोणताही अनुचित  प्रकार घडू नये म्हणून  जिल्हा पोलिस प्रमुख विश्वास पांढरे, शिरपुर पोलिस विभागीय अधिकारी अनिल  माने   व जिल्हा गुन्हे  अन्वेषणचे हेमंत पाटील यांचा मार्गदर्शनखाली दोंडाइचा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे राकेश खांडेकरसह पाच पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक, नऊ पोलीस उपनिरीक्षक, १२० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलिसांचे एक प्लाटून,   70 होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात होते.शहरात गणेश विसर्जन मिरवणुका रात्री उशीरापर्यंत शांततेत सुरु होत्या. यावेळी गणेश मंडळांकडून मोठ्याप्रमाणावर गुलालाची उधळण करण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे