शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाच्या पुतळ्यावर विमानाद्वारे होणार पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:31 IST

डॉ़बाबासाहेब आंबेडकर जयंती : शहरात भिमगीतांसह विविध कार्यक्रमांचे आज आयोजन

धुळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मध्यवर्ती पुतळ्यावर विमानातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे़ सामूहिक बुध्दवंदना, रक्तदान शिबिर, अन्नदान व भीमगीतांचे आयोजन करण्यात आले आहे़भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती धुळे जिल्हा मध्यवर्ती समितीच्यावतीने सकाळी ९ वाजेला शहरातील पूणाकृती पुतळ्याजवळ सामुदायिक बुद्ध वंदना तसेच क्यूमाईन क्लब, टेक्निकल हायस्कुल जिल्हा कारागृहा समोर रात्री ८ वाजेला भीम गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समितीचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम गरुड यांच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी दिपक गवळे, अनिरुद्ध अमृतसागर, साहेबराव पाईकराव, दिपक देवरे, राजाभाऊ उमाळे, राजु पवार,रत्नशील सोनवणे, विक्रम मोरे,बंडू गांगुर्डे, विनायक अहिरे, अयुब खाटीक, अमीन अन्सारी, कैलास गवळी, आदित्य बोरसे, सागर चव्हाण, राहुल गरुड, मानव गरुड आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.भीम गीतांचा कार्यक्रमसमता संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या विद्यमाने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२८ व्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्यावतीने सायंकाळी ७ वाजेला पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ गायक प्रकाश नाथ पाटणकर नागपूर यांचा बुद्ध व भीमगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विमानातून होणार पुष्पवृष्टीशहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यावर विमानाद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे़ या उपक्रमासाठी किशोर महाले यांचे सहकार्य मिळत असून अनोखी उपक्रमाची संकल्पना अ‍ॅड़भैय्यासाहेब झाल्टे, अ‍ॅड़ जितेंद्र निळे व अविनाश थोरात यांनी मांडली आहे़ यशस्वीतेसाठी संजय चव्हाण, मुन्ना पाटोळे, मिलिंद खैरनार, छोटू जवरास, छोटू खरात, प्रशांत वाघ, आनंद गांगुर्डे, नितीन पाटील, निनाद पाटील आदी परिश्रम घेत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे