कलमाडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मालुबाई शिवाजीराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष पी. जे. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रा. जि. प. मराठी केंद्र शाळेत जि. प. सदस्य ( खलाणे गट ) युवराज शिवाजीराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रावण दगाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. ए. कदम, उपसरपंच भाईदास दगा पाटील व ग्रामपंचायत सदस्य मंडळी, माता तुळजा भवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था अध्यक्षजे. बी. पाटील व पी. जे. पाटील, संस्थेचे संचालक मंडळी, व शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती गावातील पोलीस पाटील भाऊराव कौतीक पाटील, तंटामुक्त अध्यक्ष देवीदास दगाजी पाटील, सोसायटी सेक्रेटरी आणि मुख्याध्यापक एस. ए. कदम व शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद, प्राथमिक केंद्र शाळातील केंद्रप्रमुख नानासाहेब राजपूत, मुख्याध्यापिका छाया पाटील व शिक्षक बंधू- भगिनी, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद,अंगणवाडी-बालवाडी शिक्षक- सेविका व आरोग्यसेवक व सेविका कर्मचारीवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.